शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या किती? मोदी सरकारनं संसदेत दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 13:44 IST

CoronaVirus News: केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी राज्यसभेत दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली: आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेनं ओमायक्रॉन असं नाव दिलं आहे. हा व्हेरिएंट अधिक संक्रामक असल्यानं सगळ्याच देशांनी धास्ती घेतली आहे. या व्हेरिएंटबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी संसदेत महत्त्वाची माहिती दिली.

देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं मांडविय यांनी राज्यसभेत सांगितलं. नवा व्हेरिएंट आतापर्यंत १४ देशांमध्ये सापडला आहे. मात्र भारतात या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती मांडविय यांनी दिली. केंद्र सरकार संपूर्ण काळजी घेत असून जिनॉम सिक्वन्सिंग करत असल्याचं त्यांनी सांगितलं.ओमायक्रॉन व्हेरिएंट संदर्भात आरोग्य मंत्रालयाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीमध्ये ओमायक्रॉनची लक्षणं आढळून आल्यास त्याची त्वरित चाचणी करण्यात येत आहे. जिनॉम सिक्वन्सिंगचं कामदेखील सुरू आहे, अशी माहिती प्रश्नोतराच्या कालावधीत मांडविय यांनी दिली.ओमायक्रॉनची लक्षणं काय?आतापर्यंत ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं आढळून आली असल्याची माहिती डॉ. एँजेलिक कोएत्जी यांनी दिली. डॉक्टर एँजेलिक कोएत्जी यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंट शोधून काढला आहे. ओमायक्रॉनची लक्षणं सर्वप्रथम एका ३० वर्षीय तरुणामध्ये आढळून आल्याचं कोएत्जी यांनी सांगितलं. त्याला प्रचंड थकवा जाणवत होता. त्याला काही प्रमाणात डोकेदुखीचा त्रास होता. संपूर्ण शरीरात वेदना जाणवत होत्या, अशी माहिती कोएत्जी यांनी दिली.याआधी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना घशात खवखव जाणवायची. मात्र ओमायक्रॉनची लागण झालेल्याना ती समस्या जाणवत नाहीए. या रुग्णांना खोकल्याचा त्रास होतोय. पण त्यांच्या तोंडाची चव गेलेली नाही. वास घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम झालेला नाही, असं डॉ. कोएत्जी यांनी सांगितलं. ओमायक्रॉनची लागण झालेल्या सुरुवातीच्या काही रुग्णांमध्ये या समस्या आढळून आल्या. मात्र या व्हेरिएंटची नेमकी लक्षणं जाणून घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांचा अभ्यास गरजेचा असल्याचं कोएत्जी म्हणाल्या. डॉक्टरांनी तपासलेल्या रुग्णाला ओमायक्रॉनची लागण झाली होती. त्याच्या संपूर्ण कुटुंबालादेखील याच व्हेरिएंटची बाधा झाल्याचं चाचणीतून समोर आलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन