शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

CoronaVirus News: त्यांनी माझ्या आईला मारून टाकलं! कोविड सेंटर बाहेर आईचा मृत्यू; मुलानं फोडला टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 09:48 IST

CoronaVirus News: महिलेती प्रकृती गंभीर असतानाही वेळेवर उपचार नाही; महिलेनं कोविड सेंटरबाहेर प्राण सोडला

दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा एका दिवसात १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर अवघ्या अडीच आठवड्यांत हा आकडा ३ लाखांच्या पुढे गेला. गेल्या ६ दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे अनेक राज्यांमधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्यानं त्यांचे अतोनात हाल होत आहेत. 'त्या' १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्याच्या हालचाली; महाराष्ट्रातील किती जिल्हे?राजधानी दिल्लीत काल एका कोरोनाग्रस्त महिलेनं रिक्षामध्येच प्राण सोडला. महिलेचा मुलगा मुकूल व्यास तिला दक्षिण दिल्लीतल्या सरदार वल्लभ भाई पटेल कोविड केअर सेंटरवर घेऊन आला होता. आईवर वेळेत उपचार व्हावेत म्हणून त्यानं बरेच प्रयत्न केले. मात्र सेंटरचं प्रवेशद्वार उघडण्यात आलं नाही. आईनं रिक्षातच प्राण सोडला आणि मुलानं फुटपाथवर टाहो फोडला.राज्यात कडक निर्बंध 10 दिवस वाढणार?; आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयमुकूल व्यास त्यांची ५२ वर्षीय आई किरण व्यास यांना घेऊन कोविड केअर सेंटरबाहेर पोहोचले. आईला लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी ३ तास त्यांचे प्रयत्न सुरू होते. मुकूल यांच्या भावानं आईची छातीवर पंप करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळेच प्रयत्न तोकडे पडले. त्यांनी माझ्या आईला मारून टाकलं. आती मी घेऊन कुठे जाऊ, असा आर्त सवाल मुकूलनं विचारला.मी इथे उभा राहून कित्येक तासांपासून वाट पाहत होतो. औपचारिकता पूर्ण करा, असं कोविड केअरचे कर्मचारी मला सांगत होते. मी आक्रोश करत होतो. रडत होतो. पण तरीही मदतीला कोणीच आलं नाही. आता माझी आई या जगात नाही. ती आम्हाला सोडून गेली आहे, अशा शब्दांत मुकूल यांनी त्यांची व्यथा मांडली. माझ्या आईची प्रकृती अतिशय गंभीर होती. आमच्या हातात खूप कमी वेळ होता. त्यातही मला औपचारिकता पूर्ण करायला सांगितल्या गेल्या. कोणीही संवेदनशीलपणा दाखवून मला मदत केली नाही, असं मुकूल यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या