शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: देशात कोरोनाचा हाहाकार! पहिल्यांदाच रुग्णसंख्या ४ लाख पार; जगातील विक्रमी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 10:07 IST

CoronaVirus News: देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांचा आकडा ३२ लाखांच्या पुढे; आतापर्यंत २ लाख ११ हजार जणांचा मृत्यू

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरश: थैमान घातलं आहे. एप्रिलमध्ये कोरोनानं सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. आता मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं नवा विक्रम केला आहे. देशात पहिल्यांदा एकाच दिवसात कोरोनाचे ४ लाखाहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १ हजार ९९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ३ हजार ५२३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २ लाख ९९ हजार ९८८ इतकी आहे.देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी १ कोटी ५६ लाख ८४ हजार ४०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २ लाख ११ हजार जणांचा मृत्यू झाला. सध्याच्या घडीला देशात ३२ लाख ६८ हजार ७१० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची लागण होणाऱ्यांचं प्रमाण दिवसागणिक वाढत असल्यानं रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड मोठा ताण आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.VIDEO: माझी आई मरेल हो...! मुलगा ओरडत राहिला; पोलिसांनी VIPसाठी ऑक्सिजन सिलिंडर हिसकावलागेल्या महिनाभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावएप्रिलमध्ये कोरोनानं देशात वेगानं हातपाय पसरले आहेत. ५ एप्रिलला देशात पहिल्यांदा कोरोनाचे एक लाख रुग्ण आढळले. त्यानंतर हा आकडा सातत्यानं वाढत गेला. १५ एप्रिलला देशात प्रथमच २ लाख रुग्णांची नोंद झाली. २२ एप्रिलला देशात पहिल्यांदाच ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. यानंतर आज म्हणजेच १ मे रोजी देशात ४ लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. कोरोना रुग्ण वाढीचा वेग अक्षरश: धडकी भरवणारा आहे. मे महिन्याच्या मध्यात देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या