शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: नव्या रुग्णांचा ४५ दिवसांतील नीचांक; कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 06:07 IST

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ७७ लाख २९ हजार २४७ इतकी असून त्यातील २ कोटी ५१ लाख ७८ हजार ११ जण बरे झाले.

नवी दिल्ली : देशात शनिवारी कोरोनाचे १ लाख ७३ हजार ७९० नवे रुग्ण आढळून आले. गेल्या ४५ दिवसांतील हा नीचांक आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून शनिवारी २ लाख ८४ हजार ६०१ जण या संसर्गातून बरे झाले व ३६१८ जणांचा बळी गेला.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ७७ लाख २९ हजार २४७ इतकी असून त्यातील २ कोटी ५१ लाख ७८ हजार ११ जण बरे झाले. देशात सध्या २२ लाख २८ हजार ७२४ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत व बळींची एकूण संख्या ३ लाख २२ हजार ५१२ इतकी झाली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९०.८० टक्के आहे. जगभरात १७ कोटी १ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १५ कोटी २० लाख रुग्ण बरे झाले आहेत. तसेच ३५ लाख ३८ हजार जणांचा बळी गेला आहे. जगात १ कोटी ४४ लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेमध्ये ३ कोटी ४० लाख रुग्ण आहेत. त्यातील २ कोटी ७७ लाख जण बरे झाले आहेत तर ५६ लाख ४६ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या देशात कोरोनामुळे ६ लाख ८ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझिलमध्ये १ कोटी ६३ लाख कोरोना रुग्ण आहेत व ४ लाख ५९ हजार लोकांचा बळी गेला. ही संख्या भारतातील बळींपेक्षा अधिक आहे.युरोपमध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठी घटयुरोपममध्ये उन्हाळ्याच्या मोसमामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. या खंडातील देशांमध्ये लसीकरणाने वेग घेतला असून त्यामुळेही परिणाम साधता आल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. जगातील इतर खंडांच्या तुलनेत युरोपमध्ये या आठवड्यात नवे कोरोना रुग्ण व मरण पावलेल्याची संख्या कमी होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या