शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनामुळे १८ दिवसांत कुटुंब उद्ध्वस्त; चार जणांचा मृत्यू, सुनेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 15:09 IST

CoronaVirus News: कोरोनामुळे हसतंखेळतं कुटुंब उद्ध्वस्त; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

देवास: गेल्या दोन दिवसांत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत थोडी घट झाली आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, बिहारमधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यात एका कुटुंबावर कोरोनामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या १८ दिवसांत कुटुंबातील ४ सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.कोरोनामुळे देवासमधील एक हसतंखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. गेल्या १८ दिवसांत कुटुंबातील ४ सदस्यांचं कोरोनामुळे निधन झालं. या धक्क्यानं घरच्या सुनेनं आत्महत्या केली. त्यामुळे आता कुटुंबात केवळ एक वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलं आहेत. देवासच्या मैनाश्री नगरात वास्तव्यास असलेल्या बालकिशन गर्ग यांच्या कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला आहे. बालकिशन गर्ग यांची पत्नी चंद्रकला देवी यांचं सर्वात आधी कोरोनामुळे निधन झालं. १९ एप्रिलला गर्ग यांनी त्यांचा मोठा मुलगा संजय कोरोनामुळे गमावला. त्यानंतर २० एप्रिलला त्यांचा लहान मुलगा स्वप्नेशचं कोरोनामुळे निधन झालं. पत्नी आणि दोन मुलांच्या निधनामुळे गर्ग यांना धक्का बसला. घरावर आलेल्या संकटामुळे लहान सून रेखा अक्षरश: कोलमडून पडली. तिला हे धक्के सहन झाले नाहीत. तिनं २१ एप्रिलला आत्महत्या करून जीवन संपवलं.रेखाच्या आत्महत्येमुळे कुटुंब आणखी संकटात सापडलं. घरात केवळ बालकिशन गर्ग, त्यांची मोठी सून रितू आणि चार लहान लहान मुलं राहिली. मात्र दुर्दैवाचा फेरा इथेच थांबला नाही. रितू गर्ग यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना इंदूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रविवारी त्यांची प्रकृती अधिक बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे आता कुटुंबात केवळ बालकिशन गर्ग आणि दोन मुलांची चार लहान मुलं आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या