CoronaVirus News: कोर्टातील वकील, कर्मचाऱ्यांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 04:10 AM2020-06-27T04:10:45+5:302020-06-27T04:10:53+5:30

वकिलांना सध्या उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळा आणि नमुना पाठवण्याच्या सुविधांचाही लाभ घेणे शक्य आहे, असे मत नोंदवत कोर्टाने याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

CoronaVirus News: Court lawyers, corona to staff | CoronaVirus News: कोर्टातील वकील, कर्मचाऱ्यांना कोरोना

CoronaVirus News: कोर्टातील वकील, कर्मचाऱ्यांना कोरोना

Next

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत असलेल्या न्यायालयांच्या आवारातील वकील, न्यायालयीन अधिकारी, इतर कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना कोरोना चाचणीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या, या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास दिल्ली हायकोर्टाने शुक्रवारी नकार दिला. मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. प्रतीक जालान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. अ‍ॅड. विशेष वर्मा यांनी ही याचिका दाखल केली होती.
वर्मा यांनी याचिकेत म्हटले होते की, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांनंतर वकिलांनाही मोठ्या प्रमाणावर लोकांच्या संपर्कात रहावे लागत असल्याने त्यांनाही कोरोना चाचणीच्या सुविधा पुरवणे गरजेचे आहे. परंतु हा युक्तिवाद कोर्टाला पटला नाही. वकिलांना सध्या उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळा आणि नमुना पाठवण्याच्या सुविधांचाही लाभ घेणे शक्य आहे, असे मत नोंदवत कोर्टाने याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

Web Title: CoronaVirus News: Court lawyers, corona to staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.