शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

CoronaVirus News : चिंता वाढली! महाकुंभात कोरोनाचे थैमान; १०२ संत, भाविकांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 07:21 IST

CoronaVirus News : महाकुंभामध्ये साेमवती अमावस्येच्या पर्वावर शाही स्नान पार पडले. त्यावेळी लाखाे भाविकांनी गर्दी केली हाेती. काेराेना नियमावलीची सर्वत्र पायमल्ली हाेताना दिसून आली.

हरिद्वार : देशात काेराेनाचे दरराेज दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळत असतानाच महाकुंभात दुसऱ्या शाही स्नानानंतर १०२ साधू, महंत व भाविक कोराेना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे महाकुंभ प्रशासनाची चिंता वाढली आहे. लाखाे भाविकांच्या उपस्थितीत काेराेना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासन पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसत आहे. महाकुंभामध्ये साेमवती अमावस्येच्या पर्वावर शाही स्नान पार पडले. त्यावेळी लाखाे भाविकांनी गर्दी केली हाेती. काेराेना नियमावलीची सर्वत्र पायमल्ली हाेताना दिसून आली. अनेक साधू, भाविकांनी साेशल डिस्टंसिंग आणि मास्कच्या नियमांचे पालन न करता स्नान केले. त्याची परिणती म्हणजे १०२ साधू आणि भाविकांचे काेराेना रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. पाेलीस यंत्रणेने सक्तीने नियमांची अंमलबजावणी करण्यात असमर्थता व्यक्त करतानाच चेंगराचेंगरी हाेण्याची भीती व्यक्त केली हाेती. रविवारपासून साेमवारी सायंकाळपर्यंत प्रशासनाने १८ हजार भाविकांच्या चाचण्या केल्या. प्रशासनाने दरराेज ५० हजार चाचण्या करण्याचा दावा केला हाेता. मात्र, ताे फाेल ठरला. रेल्वेस्थानकापासून हर की पाैडी तसेच इतर घाटांवर कुठेही थर्मल स्क्रीनिंग केले जात नव्हते. थर्मल स्कॅनरची सुविधा असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर परिसरात आहे. मात्र, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई हाेत नव्हती.   (वृत्तसंस्था)

विनाचाचणी भाविक दाखलमहाकुंभासाठी येणाऱ्या भाविकांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक आहे. मात्र, अनेक भाविक विनाचाचणी दाखल हाेत असल्याचेही आढळून आले आहे. चाचणी अहवाल तपासण्यासाठीही यंत्रणा नाही. कुठल्याही एका ठिकाणी माेठी गर्दी हाेऊ नये, यासाठी चालान आणि थर्मल स्क्रीनिंग सध्या टाळले आहे. गर्दी नियंत्रणावर सध्या लक्ष केंद्रित केल्याचे पाेलीस महानिरीक्षक संजय गुंज्याल यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या