शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: स्पुटनिक लसीचं उत्पादन करण्याची परवानगी द्या; सीरमचा DCGIकडे अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 12:52 IST

CoronaVirus News: कोविशील्डची निर्मिती करणारी सीरम आता स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. ही लाट थोपवण्यासाठी कोरोनी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. देशाच्या अनेक राज्यांमध्ये लसींची टंचाई जाणवत असताना आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनासाठी परवानगी मागितली आहे. स्पुटनिक व्ही लसीच्या निर्मितीसाठी सीरमनं औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) अर्ज केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.पुण्यात मुख्यालय असलेली सीरम सध्याच्या घडीला कोविशील्ड लसींचं उत्पादन करत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकानं यासाठीचं संशोधन केलं असून निर्मितीची जबाबदारी सीरमकडे आहे. कोविशील्ड लसीच्या उत्पादनाला वेग देत असताना सीरमनं आता स्पुटनिकच्या निर्मितीसाठीदेखील अर्ज केला आहे. सध्या स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून करण्यात येत आहे. डीसीजीआयनं सीरमला स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करण्याची परवानगी दिल्यास लसींचं उत्पादन अतिशय गतीमान होईल. जगातील सर्वात मोठी औषध उत्पादक कंपनी असा सीरमचा लौकिक आहे.सीरम जून महिन्यात कोविशील्डच्या १० कोटी डोसचं उत्पादन करणार आहे. तशी माहिती सीरमनं आधीच सरकारला दिली आहे. सीरम सध्याच्या घडीला नोवावॅक्सचीदेखील निर्मिती करत आहे. नोवावॅक्सला लवकरच अमेरिकेकडून मंजुरी मिळू शकते. रशियन लस असलेल्या स्पुटनिक व्ही लसीच्या आपत्कालीन वापरास डीसीजीआयनं एप्रिलमध्ये परवानगी दिली. स्पुटनिक व्ही लसीचे ३० लाख डोस काही दिवसांपूर्वीच रशियाहून हैदराबादला आले. देशात आयात झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा लसींचा साठा आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस