शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

CoronaVirus News: 'त्या' ५६५ जणांनी झोप उडवली; कोरोना रुग्णांचा आकडा वेगानं वाढणार?

By कुणाल गवाणकर | Updated: December 30, 2020 10:42 IST

CoronaVirus News: ब्रिटनहून आलेल्या नव्या स्ट्रेनमुळे धाकधूक वाढली

लखनऊ: देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटींच्या पुढे गेली आहे. सध्याच्या घडीला देशात दररोज कोरोनाचे सरासरी २० हजार रुग्ण आढळून येत आहेत. एका बाजूला कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग मंदावला असताना दुसरीकडे ब्रिटनहून आलेल्या नागरिकांनी चिंता वाढवली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला. त्यामुळे गेल्या महिन्याभरात ब्रिटनहून आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.ब्रिटनहून आलेल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याचं काळजी वाढली आहे. त्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे. ब्रिटनहून आलेले प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आल्यास संबंधित भागांत कन्टेनमेंट झोनमध्ये लागू असलेल्या नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. ब्रिटनमहून आलेल्या ५६५ जणांशी आरोग्य विभागाचा कोणताही संपर्क होत नसल्यानं चिंतेत भर पडली आहे. आरोग्य विभागानं अनेकदा पुढे येण्याचं आवाहन करूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.ब्रिटनहून एकूण १ हजार ६५५ जण उत्तर प्रदेशात आले. त्यांची यादी केंद्र सरकारनं उत्तर प्रदेश सरकारला दिली. यातील १ हजार ९० प्रवाशांशी संपर्क साधण्यात यश आलं आहे. मात्र उर्वरित प्रवाशांशी संपर्क होऊ शकलेला नाही. यातील बहुतांश जणांचे मोबाईल स्विच ऑफ आहेत. ब्रिटनहून राज्यात परतलेल्या एका दोन वर्षांच्या मुलीला नव्या स्ट्रेनची लागण झाल्यानं आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. काल दुपारपर्यंत आरोग्य विभागाकडे या मुलीची माहिती उपलब्ध नव्हती.आयसीएमआरकडून एक ते दोन दिवसांत जीनोम सिक्वेंसिंगचा अहवाल दिला जाईल असा दावा करण्यात आला होता. मात्र काल संध्याकाळी उशिरा एका चिमुरडीला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचं समजताच संपूर्ण रणनीती बदलावी लागली आहे. ब्रिटनहून परतलेले प्रवासी वास्तव्यात असलेल्या भागांमध्ये आयसोलेशन आणि कन्टेनमेंटच्या नियमांचं सक्तीनं पालन केलं जात आहे. त्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली जात आहे. ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांच्या घराबाहेर पोस्टर चिकटवण्याचे आदेशही आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या