शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
3
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
4
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
5
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
6
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
7
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
8
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
9
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
10
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
11
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
12
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
13
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
14
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
15
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
16
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
17
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
18
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
19
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
20
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...

CoronaVirus News : देशात २८,७०१ नवे रुग्ण; ५ लाख ५३ हजार ४७० झाले पूर्ण बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 06:43 IST

गेल्या चोवीस तासांत आणखी ५०० जण या आजाराने मरण पावल्याने एकूण बळींची संख्या २३,१७४ झाली आहे.

नवी दिल्ली : देशात एकाच दिवसात कोरोनाचे २८,७०१ नवे रुग्ण आढळून आले असून ही विक्रमी वाढ आहे. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ८ लाख ७८ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांत आणखी ५०० जण या आजाराने मरण पावल्याने एकूण बळींची संख्या २३,१७४ झाली आहे.६३.०१ रुग्ण बरे झालेकोरोनाच्या आजारातून उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या ५,५३,४७० इतकी झाली आहे. तर ३,०१,६०९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६३.०१ टक्के आहे.

लॉकडाऊनमध्ये वाढदेशात कोरोनाचे २६ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तेरा दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत तीन लाखांनी वाढ झाली. कोरोनाच्या फैलाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम आदी राज्यांनी लॉकडाऊनची मुदत वाढविली आहे.इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी देशभरात कोरोनाच्या 219103 चाचण्या पार पडल्या. त्यामुळे या दिवसापर्यंत राष्ट्रीय स्तरावर कोरोनाच्या चाचण्यांची एकूण संख्या १,१८,०६,२५६ झाली आहे.दिलासा : मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ७० टक्के !मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७० टक्क्यांवर पोहोचला आहे. तर ५ ते १२ जुलैपर्यंत कोविड वाढीचा दर १.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण दुपटीचा दर ५१ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत दिवसभरात १ हजार १५८ कोरोनाबाधित रुग्ण तर ४७ मृत्यूंची नोंद झाली. मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९४,१४६ झाली असून मृतांचा आकडा ५,३३५ झाला आहे. आतापर्यंत शहर, उपनगरातील ६५,६२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.राज्यात दिवसभरात ६,४९७ नवे कोरोना रुग्णमुंबई : राज्यात सोमवारी दिवसभरात ६ हजार ४९७ रुग्ण वाढले आणि १९३ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ६० हजार ९२४ झाली असून बळींचा आकडा १० हजार ४८२ झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के तर मृत्यूदर ४.०२ टक्के झाला आहे. राज्यात सोमवारी १९३ मृत्यूंची नोंद झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या