शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनामुळे देशातील ५००हून अधिक डॉक्टरांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 06:55 IST

CoronaVirus News: धक्कादायक! केवळ ६२ जणांना विम्याचा लाभ; इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती

मुंबई : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या तब्बल ५१५ डॉक्टरांचा कोरोनामुळे बळी गेला. यातील २९२ डॉक्टर राज्यातील आहेत. कोरोना रुग्णांची सेवा करताना झालेल्या संसर्गामुळे या डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती आयएमएने दिली. दुर्दैवी बाब म्हणजे यातील केवळ ६२ डॉक्टरांच्या कुटुंबीयांनाच सरकारने जाहीर केलेल्या विम्याचा लाभ मिळाला.देशभरातील १ हजार ७४६ शाखांमधून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांची आकडेवारी समोर आली. हे सर्व अ‍ॅलोपॅथी शाखेतील डॉक्टर आहेत. मात्र, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या डॉक्टरांची संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी व्यक्त केली.आयएमएच्या माहितीनुसार, देशात १९४ रुग्णांमागे एक डॉक्टर असे प्रमाण आहे. कोरोनामुळे जीव गमावलेल्या डॉक्टरांमध्ये २०१ डॉक्टर ६० ते ७० वयोगटातील आहेत. तर १७१ डॉक्टर्स ५० ते ६० वयोगटातील आहेत. सत्तरपेक्षा अधिक वय असणाऱ्या ६६ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३५ ते ५० वयोगटातील ५९ आणि ३५ पेक्षा कमी वय असणाºया १८ डॉक्टरांना जीव गमवावा लागला. मात्र केंद्र सरकारकडे कोरोनामुळे जीव गमावलेल्या डॉक्टरांविषयी कोणताही डेटा नसल्याची माहिती डॉ. शर्मा यांनी दिली.८७ हजार बाधितआतापर्यंत देशभरातील ८७ हजार वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रंटलाइनर्स कोविड योद्ध्यांसाठी जाहीर केलेल्या विमा योजनेचा लाभ ५१५ पैकी केवळ ६२ डॉक्टरांना मिळाला. अजूनही १३० विमा प्रतीक्षेत आहेत. शिवाय, अजूनही काही राज्यांकडून विम्यासाठीची सर्व कागदपत्रे आलेली नाहीत. केंद्राने डॉक्टरांच्या माहितीचा डेटाबेस तयार करायला हवा, अशी मागणी डॉ. शर्मा यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या