शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

CoronaVirus News: कोरोनाविषयक शारीरिक अंतराचे नियम पाळून सप्टेंबरमध्ये होणार संसदेचे पावसाळी अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 06:47 IST

एक दिवसाआड भरतील सभागृहे; आसनरांगांमध्ये पॉलिकॉर्बोनेट शीट बसविणार

नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेकविध पर्यायांचा विचार केल्यानंतर संसदेचे पावसाळी अधिवेशन आभासी पद्धतीने न घेता प्रत्यक्षरीत्या घेण्याचा निर्णय लोकसभा आणि राज्यसभा अध्यक्षांनी घेतला आहे. सध्याच्या नियोजनानुसार, हे अधिवेशन सप्टेंबरमध्ये होऊ शकते. एक दिवस लोकसभा आणि एक दिवस राज्यसभा, असे एकदिवसाआड अथवा सकाळी आणि संध्याकाळी, अशा दोन पाळ्यांत सभागृहे भरू शकतील. कोरोनामुळे मार्चनंतर संसदेचे अधिवेशन झालेले नाही.उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, अधिवेशनात कोरोनासाठी आवश्यक असलेले शारीरिक अंतराचे नियम पाळले जातील. त्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था दूर-दूर केली जाईल. अशा व्यवस्थेत लोकसभेच्या सर्व ५४२ सदस्यांना सभागृहात बसता येणार नाही. त्यापैकी १६८ सदस्यच लोकसभेत बसू शकतील. इतरांना लोकसभेच्या गॅलरीत, राज्यसभेत आणि राज्यसभेच्या गॅलरीत बसविले जाईल.राज्यसभेच्या २४१ सदस्यांनाही असेच दोन्ही सभागृहांत बसविले जाईल. राज्यसभेचे सभागृह आणि गॅलरीत ७६ सदस्य बसू शकतील. तथापि, समोरच्या रांगांतील आसने ज्येष्ठ सदस्यांसाठी जोखिमेची ठरण्याची शक्यता असल्याने ही आसने रिक्तच ठेवली जातील. योग्य शारीरिक अंतर राखण्यासाठी दोन आसन रांगांच्यामध्ये पॉलिकार्बोनेटचे शीट बसविले जाईल. कमी सदस्य असल्यामुळे राज्यसभेसाठी असे शीट वापरण्याची गरज भासणार नाही. गॅलरीत तसेच इतर चेंबर्समध्ये बसलेल्या सदस्यांना कामकाज नीट दिसावे यासाठी मोठ्या आकाराचे दूरचित्र पडदे बसविले जातील. प्रत्येकाच्या आसनावर ध्वनिक्षेपक असेल. प्रत्येक हस्तक्षेप आणि निवेदन दोन्ही सभागृहांत तसेच गॅलऱ्यांत सहप्रक्षेपित केले जाईल.राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार होणार बसण्याची व्यवस्थासूत्रांनी सांगितले की, प्रत्येक राजकीय पक्षाच्या संख्याबळानुसार त्यांची बसण्याची व्यवस्था केली जाईल. अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर हा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. भारत सरकारला सायबर सुविधा पुरविणाºया नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरकडून एक अ‍ॅप विकसित करून दिले जाणार आहे. त्याद्वारे संसद सदस्य आपले मतदान करू शकतील.राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी आभासी अधिवेशनाचा पर्याय समोर ठेवला होता. प्रत्येक जिल्ह्यातील एनआयसी सेंटरचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या स्वरूपात अधिवेशन घ्यावे, असा त्यांचा विचार होता. तथापि, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रत्यक्ष अधिवेशनाचा आग्रह धरला. तो स्वीकारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParliamentसंसद