शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

Coronavirus: मोदींच्या आवाहनाला मातोश्रींची साथ; पीएम केअर्स फंडाला दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 20:22 IST

आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईनंसुद्धा पीएम केअर्स फंडाला मदत दिली आहे. मोदींची आई हिरा बेन हिनं २५ हजार रुपयांची देगणीच्या स्वरूपात मदत केली आहे.

नवी दिल्ली- कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी मोदी सरकारनं लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान केअर्स फंडही सुरू केला आहे. या फंडाला मदत करण्यासाठी अनेक उद्योगपती आणि व्यावसायिक पुढे सरसावले आहेत. जो तो आपापल्या परीनं या फंडाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. टाटा समूह आणि मुकेश अंबानींच्या रिलायन्स समूहानं या फंडाला भरघोस मदत जाहीर केली आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईनंसुद्धा पीएम केअर्स फंडाला मदत दिली आहे. मोदींची आई हिरा बेन हिनं २५ हजार रुपयांची देगणीच्या स्वरूपात मदत केली आहे. त्यांनी जमवलेल्या रकमेतून पीएम फंडाला हे पैसे दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिरा बेन ९८ वर्षांच्या असून, त्या गुजरात गांधीनगरमधील रायसीन गावात वास्तव्याला आहेत. नरेंद्र मोदींचे लहान बंधू पंकज मोदींसोबत त्या राहतात. पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेल्या जनता कर्फ्यूलाही त्यांनी थाळीनादाच्या माध्यमातून प्रतिसाद दिला होता. आपात्कालीन परिस्थितीसाठी मोदी केअर्स हा फंड बनवण्यात आला असून, कोरोना व्हायरसविरोधात सुरू असलेल्या लढ्याला सर्वसामान्यांच्या माध्यमातून या फंडाला मदत दिली जात आहे. कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वसामान्यांबरोबर देशभरातील उद्योगपती आपापल्यापरीनं मदत करत असून, टाटा ग्रुपने १५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.   रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुकेश अंबानी आणि टाटा ग्रुपच्या रतन टाटांनी सर्वाधिक मदत केली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या