शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Coronavirus: ७२ तासांत कोरोनामुळं कुटुंब उद्ध्वस्त; सासऱ्याची चिता शांत होईपर्यंत पतीलाही द्यावा लागला मुखाग्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 09:12 IST

३ दिवसांत महिलेचा पती आणि सासऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. घरात एकटीच असलेल्या महिलेने पती आजारी असल्याकारणाने सासऱ्याच्या मृतदेहावर तिनेच अंत्यसंस्कार केले.

ठळक मुद्देकुटुंबाला कोरोनाची नजर लागली. सुरुवातीला महिलेच्या पतीला ताप आला आणि त्यानंतर सासरेही आजारी पडलेकाळजावर दगड ठेवत महिलेनं सासऱ्याचे अंत्यसंस्कार केले कारण त्यावेळी पती व्हेंटिलेटरवर होता.सासऱ्यावर अंत्यसंस्कार करून घरी परतच नाही तोवर पतीच्या मृत्यूची बातमी कानावर पडली.

मेरठ – देशात कोरोनाची दुसरी लाट पसरल्यानंतर अनेकांनी आपल्या जीवाभावाची माणसं गमावली आहे. कोरोनानं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केल्याच्या घटना वाचायला मिळाल्या आहेत. मेरठमध्ये अशीच ह्दयद्रावक घटना घडली आहे. जी ऐकून तुमचंही काळीज पिळवटून जाईल. या शहरात राहणारं ३ जणांचं कुटुंब अवघ्या ३ दिवसांत हादरलं आहे. पती, पत्नी आणि सासरे असं तिघांचे हसतं खेळतं कुटुंब होतं. सर्वजण आनंदात जीवन जगत होते. परंतु या कुटुंबावर कोरोनाचं ग्रहण लागलं.

३ दिवसांत महिलेचा पती आणि सासऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. घरात एकटीच असलेल्या महिलेने पती आजारी असल्याकारणाने सासऱ्याच्या मृतदेहावर तिनेच अंत्यसंस्कार केले. त्यानंतर घरी परतली असता पतीचाही जीव गेल्याची बातमी तिच्या कानावर पडली आणि तिला प्रचंड धक्का बसला. पतीच्या मृतदेहाला मुखाग्नी देताना ज्यांनी ही दृश्य पाहिली त्यांच्याही डोळ्यातून पाणी आलं. कोरोनानं हसत्याखेळत्या कुटुंबाला संपवलं. कुठे आईनं त्याच्या लाडक्या मुलाला गमावलं तर कुठे पतीनं पत्नीची आयुष्यभराची साथ सोडली. मेरठमध्ये एका कुटुंबावर कोरोनानं असा आघात केला की, ३ दिवसांत या कुटुंबाचं होत्याचं नव्हतं झालं.

कुटुंबाला कोरोनाची नजर लागली. सुरुवातीला महिलेच्या पतीला ताप आला आणि त्यानंतर सासरेही आजारी पडले. बघता बघता संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह झालं. ३ दिवसांत पहिल्यांदा सासरे आणि त्यानंतर महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. काळजावर दगड ठेवत महिलेनं सासऱ्याचे अंत्यसंस्कार केले कारण त्यावेळी पती व्हेंटिलेटरवर होता. परंतु सासऱ्यावर अंत्यसंस्कार करून घरी परतच नाही तोवर पतीच्या मृत्यूची बातमी कानावर पडली. त्यानंतर महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. त्यातूनही धैर्याने तिने पतीवर अंत्यसंस्कार केले. ज्या कोणी महिलेला चितेला आग लावताना पाहिले त्यांचेही डोळे पाणावले.

मेरठच्या कंकरखेडा परिसरात राहणारं हे छोटं कुटुंब आनंदात जीवन जगत होतं. २०१९ मध्ये पूजा आणि मयांकचं लग्न झालं होतं. पती मयांक शिक्षक होते तर सासरे निवृत्त कर्मचारी होते. हे कुटुंब कोरोनाच्या जाळ्यात अडकलं. त्यानंतर ३ दिवसांत कुटुंबातील दोन पुरुष गमावल्यानं महिला एकटी पडली. पूजाच्या नातेवाईकांनी सांगितले की, या कुटुंबात केवळ तिघंच जण होते. ७२ तासांत एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. देव करो अन् अशी वेळ कोणावरही येऊ नये अशीच प्रार्थना नातेवाईक करत आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या