शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २३,६५१, तर ८३२४ रुग्णांना मिळालाय 'डिस्चार्ज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 10:27 IST

देशातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३० एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत देशात २३,६५१ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८३२४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे

मुंबई - देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमधील रुग्णसंख्या अधिक असल्याचे दिसून येते. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. मात्र, देशातील काही राज्यांमध्ये ३ मे नंतरही  लॉकडाऊन कायम राहिल, असे दिसून येत आहेत. सद्यस्थितीत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २३ हजार ६५१ वर पोहोचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातील रुग्णांचा आकडा ९९५१ वर पोहोचला आहे. देशातील २३,६५१ रुग्णांपैकी ८३२४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 

देशातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३० एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत देशात २३,६५१ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८३२४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. तर, या संख्येतील एक रुग्ण स्थलांतरीत आहे. देशात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १०७४ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार गुरुवार ३० एप्रिल सकाळी ०८ वाजेपर्यंतची ही माहिती आहे. याबाबत, महाराष्ट्र परिचय केंद्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.    

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हिमाचल प्रदेश मॉडेलचा विचार करावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना केली आहे. हिमाचल प्रदेश सरकारनं राज्यातल्या सर्व जनतेची तपासणी केली. शरीरात शीतज्वराची लक्षणं असल्यास त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. यानंतरही प्रकृतीत सुधारणा न झालेल्या व्यक्तींची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. याच मॉडेलचा वापर करण्याची सूचना मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना केल्याचं वृत्त 'द इकॉनॉमिक टाईम्स'नं दिलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईNarendra Modiनरेंद्र मोदी