शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: भीती कोरोनाची; स्थलांतरित कामगारांचे तांडेच्या तांडे पुन्हा गावाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 07:27 IST

मुंबईतील प्रमुख रेल्वेस्थानकांवर कामगारांची गर्दी

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबई आणि राज्यात लागू केलेल्या कठोर निर्बंधांचा विपरीत परिणाम म्हणून मुंबई शहर आणि उपनगरांत वास्तव्यास असलेले स्थलांतरित कामगार पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत. दादर, मुंबई सेंट्रल, कुर्ला टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस आणि बोरवली येथे आपल्या मूळ गावी जाणाऱ्या ट्रेन पकडण्यासाठी स्थलांतरित कामगार दाखल होत असून, यात दिवसागणिक भरत पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या काही कामगार स्थलांतर करीत आहेत. कामगारांनी स्थलांतर करू नये, तसेच अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करीत राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही सातत्याने दिली जात आहे. मात्र, आर्थिक संकटात सापडलेले कामगार पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली असून, त्यांनी गावाकडची वाट पकडली आहे. दुसरीकडे या काळात कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कारखाने, उद्योग तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांचे कोणतेही उद्योगधंदे बंद होणार नाहीत, याची संपूर्ण दक्षता व काळजी राज्य शासनाकडून घेण्यात येत आहे.कोणत्याही अफवांना बळी न पडता उद्योगधंद्यांमध्ये कार्यरत असलेल्या तसेच स्वयंरोजगार करणाऱ्या सर्व कामगार व असंघटित क्षेत्रातील कामगारांनी आपापल्या क्षेत्रातील कारखाने, उद्योगांमध्ये कोविड प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून कामकाज नियमित चालू राहील, याबाबत निश्चिंत रहावे. राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच बस, रेल्वे व खासगी वाहनांची वाहतूक व्यवस्था कोविड प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून सुरळीतपणे चालू राहणार आहे. त्यामुळे त्याबाबत कोणतीही भीती बाळगू नये. सर्वांच्या प्रवासाची व्यवस्थाही होणार आहे. प्रत्येक कामगाराने स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेताना आपापले उद्योगधंदे नियमितपणे चालविण्यासाठी संपूर्ण हातभार लावावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.कोरोनासह लॉकडाऊनमुळे ३० ते ४० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद झाली आहेत. ४० ते ५० टक्के कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. भविष्यात त्यांना नोकरी मिळेल, याची आशा धूसर झाली आहे. कारण, त्यांना रोजगार देणारे क्षेत्रच रसातळाला आले आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार काम करतात. ही संख्या ७० टक्के असावी. स्थानिक कामगार फार कमी संख्येने या क्षेत्रात आहेत.मुंबईत बाहेरील जिल्ह्यांतून, बाहेरील राज्यांतून स्थलांतरित झालेल्या मजुरांचा आकडा सुमारे ३० लाख असून, आज कोरोनाच्या संकटात हे स्थलांतरित मजूर वाऱ्यावर आहेत. या स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मुंबईत कामाठीपुरा, रे रोड, शिवडी, भायखळा, वांद्रे, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, विद्याविहार, सायन, धारावी, माहीम, अंधेरी, साकिनाका, घाटकोपर, बोरीवली, जोगेश्वरी येथे मोठ्या प्रमाणावर कामगार/मजूर राहतात. यातील बहुतांशी नाका कामगार, रोजंदारीवरचे कामगार आहेत. मात्र, आता लॉकडाऊन झाल्याने कामगारांचा रोजगार गेला. रोज हातात येणारा पैसे हातात येत नाही. त्यांना कोणी मालक नसल्याने महिन्याचा पगार कोण देणार, हा प्रश्न आहे.लॉकडाऊनच्या कटू आठवणी लॉकडाऊनच्या काळात शहरात अडकलेल्या मजूर, कामगारांना आपल्या गावी जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. कित्येक किलाेमीटर पायी चालत हे अंतर पार करावे लागले. गेल्या वर्षी बांद्रा टर्मिनसबाहेर दाेन वेळा लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणार, या अफवेमुळे गर्दी उसळली हाेती. गर्दीला पांगवण्यासाठी पाेलिसांना लाठीचार्ज करावा लागला हाेता. त्यामध्ये अनेक कामगारांचा समावेश हाेता. ती भीती आजही कायम आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या