शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

CoronaVirus Live Updates : धोका वाढला! महाराष्ट्रासह 'या' 8 राज्यांत परिस्थिती गंभीर; ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा धडकी भरवणारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 10:07 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर केंद्र सरकारने राज्यांना सतर्क केले आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देशांत कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा हा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थोडा वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती चिंताजनक आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. देशात करोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर केंद्र सरकारने राज्यांना सतर्क केले आहे. आठ राज्यांसाठी विशेष सूचना जारी केल्या आहेत. राज्यांनी कोरोना विरोधात कठोर पावले उचलावीत जेणेकरून तिसरी लाट घातक होण्यापासून रोखता येईल असं म्हटलं आहे.  

दिल्ली, हरयाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंडला या आठ राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 16,764 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 220 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी (31 डिसेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा साडे चार लाखांहून अधिक झाला आहे. 

देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 1,270 वर

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना ओमायक्रॉनने देखील चिंता वाढवली आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून धडकी भरवणारा आकडा आता समोर आला आहे. देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येने एक हजाराचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 1,270 वर पोहोचली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर देशाचा रिकव्हरी रेट 98.36 टक्क्यांवर आहे. उपचारानंतर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. याच दरम्यान आरोग्य मंत्रालयाने आठ राज्यांना कोरोनाविरोधात कठोर पावले उचलण्यास सांगितलं आहे. 

"देशात येत्या काही दिवसांत येणार कोरोनाची लाट; ओमायक्रॉनमुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ"

भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असून येत्या काही दिवसांत रुग्णवाढीचा दर वेगाने वाढणार आहे, असा इशारा केंब्रिज विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाची अल्प काळातील लाट येऊन अधिकाधिक नागरिकांना ओमायक्रॉनची लागण होण्याची भीतीही व्यक्त केली आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या जज बिजनेस स्कूलमधील प्रा. पॉल कट्टूमन यांनी "कोविड-19 इंडिया ट्रॅकर विकसित केला असून एका ई-मेलमध्ये त्यांनी लिहिले आहे, येत्या काही दिवसांत ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढेल. कदाचित या आठवडय़ातही वाढण्याची शक्यता आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत किती वाढ होईल, हे आता सांगणे कठीण आहे" असं देखील म्हटलं आहे. कट्टूमन आणि त्यांचा संशोधक गट गेल्या काही दिवसांतील भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येवर लक्ष ठेवून आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लस