शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 8 महिन्यांत एकही सुट्टी न घेता नर्सने दिले कोरोना लसीचे तब्बल 61 हजार डोस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 15:25 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : एका नर्सने गेल्या आठ महिन्यांत एकही सुट्टी न घेता काम केलं आहे. विशेष म्हणजे या कालावधीत तिने कोरोना लसीचे 61 हजार डोसेस दिले आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहून ते कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. तसेच या संकटात अनेकांनी आपल्या जवळची माणसं देखील गमावली आहेत. कोरोनामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तरीही न डगमगता, मागे न हटता वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आपलं काम करत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. 

भोपाळमधील एका नर्सने गेल्या आठ महिन्यांत एकही सुट्टी न घेता काम केलं आहे. विशेष म्हणजे या कालावधीत तिने कोरोना लसीचे 61 हजार डोसेस दिले आहेत. गायत्री श्रीवास्तव (Gayatri Srivastava) असं या महिला आरोग्य कर्मचाऱ्याचं नाव आहे. आपल्या कामाप्रति असलेलं त्यांचं समर्पण पाहून मध्य प्रदेशचे आरोग्य शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी गायत्री यांचं भरभरून कौतुक केलं आहे. भोपाळच्या रहिवासी असलेल्या गायत्री सध्या काटजू रुग्णालयात सहायक परिचारिका म्हणून सेवा देत आहेत. जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरण सुरू झाल्यापासून त्या या कामात व्यस्त आहेत. 

"एक लाख नागरिकांना लस देण्याचा संकल्प"

गायत्री यांनी 25 जानेवारीपासून आतापर्यंत एकही सुट्टी घेतलेली नाही. गेल्या आठ महिन्यांच्या काळात त्यांनी तब्बल 61 हजारांहून अधिक डोसेस दिले आहेत. एक लाख नागरिकांना लस देण्याचा आपला संकल्प असल्याचं गायत्री यांनी सांगितलं आहे. राज्याचे आरोग्य शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी गायत्री यांच्यासारख्या आरोग्य कर्मचाऱ्यांमुळेच मध्य प्रदेश कोरोना लसीकरणाचे नवनवीन विक्रम दररोज प्रस्थापित करत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. लसीकरण मोहिमेची पाहणी करण्यासाठी मंत्री सारंग यांनी काटजू रुग्णालयाला भेट दिली. त्या वेळी त्यांना गायत्री श्रीवास्तव यांच्याबद्दल माहिती मिळाली. 

एकही सुट्टी न घेता आतापर्यंत लशीचे 64 हजार डोस दिले

विश्वास सारंग यांनी गायत्री यांची भेट घेऊन त्यांच्या कामाचं खूप कौतुक केलं आणि त्यांचा सत्कारदेखील केला. मध्य प्रदेशातल्या छतरपूर रुग्णालयात कार्यरत असलेल्या एएनएम माया अहिरवार (Maya Ahirwar) यांनी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून एकही सुट्टी न घेता आतापर्यंत लशीचे 64 हजार डोस दिले आहेत. माया अहिरवार यांच्यासोबतच आता मध्य प्रदेशातल्याच गायत्री श्रीवास्तव यांचंही नाव जोडलं गेलं आहे. मध्य प्रदेशातल्या या दोन्ही परिचारिकांच्या नावांची जोरदार चर्चा सध्या सुरू असून त्यांचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश