शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: गेल्या २४ तासांत ५० हजारांपेक्षा कमी नवे रुग्ण; ४० दिवसांतील सर्वांत कमी संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 07:04 IST

जगभरात कोरोनाचे ४१ कोटी १२ लाख ३४ हजार रुग्ण असून त्यातील ३३ कोटी १३ लाख ७७ हजार रुग्ण बरे झाले.

नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत ५० हजारांपेक्षा कमी नवे रुग्ण आढळले आहेत. मागील ४० दिवसांतील ही सर्वाधिक कमी संख्या आहे. नव्या बाधितांप्रमाणेच सक्रिय रुग्णांच्या आकड्यातही घट झाली. सध्या ५ लाख ३७ हजार सक्रिय रुग्ण आहेत. देशात ४४ हजार ८७७ नवे रुग्ण सापडले. याआधी ४ जानेवारी रोजी ३७ हजार ३७९ नवे रुग्ण आढळले होते. सलग सातव्या दिवशी दररोज एक लाखांपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली. 

गेल्या चोवीस तासांत ६८४ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाने आजवर ५ लाख ८ हजार ६६५ जणांनी आपला जीव गमावला. ४ कोटी २६ लाख ३१ हजार ४२१ बाधितांपैकी ४ कोटी १५ लाख ८५ हजार ४२१ जण बरे झाले. एकूण बाधितांच्या तुलनेत सक्रिय रुग्णांचे प्रमाण १.२६ टक्के आहे. गेल्या चोवीस तासांत सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत ७३,३९८ ने घट झाली. आजवर ९७.५५ टक्के लोक कोरोनामुक्त झाले. दररोजचा व दर आठवड्याचा संसर्ग दर अनुक्रमे ३.१७ टक्के व ४.४६ टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.१९ टक्के नोंदला गेला. देशातील नागरिकांना आजवर कोरोना लसीचे १७२.८१ कोटी डोस देण्यात आले.

जगभरात ४१ कोटी १२ लाख रुग्णजगभरात कोरोनाचे ४१ कोटी १२ लाख ३४ हजार रुग्ण असून त्यातील ३३ कोटी १३ लाख ७७ हजार रुग्ण बरे झाले. या संसर्गामुळे आजवर ५८ लाख ३० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये ७ कोटी ९२ लाख रुग्ण असून तिथे ९ लाख ४२ हजार जणांचा मृत्यू झाला.  अमेरिकेपाठोपाठ भारत, ब्राझिल, फ्रान्स, ब्रिटन, रशिया, तुर्कस्थान, जर्मनी, इटली, स्पेन या देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या