शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Coronavirus: कोरोनामुळे जगात ५० लाख लोकांचा मृत्यू; भारत तिसऱ्या नंबरवर, डेल्टानं चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 05:18 IST

जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची दर आठवड्याची सरासरी काढली तर निम्मे मृत्यू अमेरिका, रशिया, ब्राझील, मेक्सिको, भारत या पाच देशांत होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्देजगभरात कोरोनामुळे एका वर्षभरात २५ लाख लोक मरण पावले. मात्र डेल्टा विषाणूमुळे मृतांचे प्रमाण झपाट्याने वाढू लागलेगेल्या आठवड्यात कोरोनामुळे जगात दररोज सरासरी ८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४ कोटी ४४ लाखांवर पोहोचली असून तिथे ७ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे

वाॅशिंग्टन : जगभरात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे. त्यामध्ये अमेरिकेतील ७ लाख मृतांचा समावेश आहे. त्याखालोखाल ब्राझीलमध्ये ५ लाख ९७ हजार व भारतामध्ये ४ लाख ४८ हजार लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. अत्यंत घातक असलेेल्या डेल्टा विषाणामुळे जगभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला असून त्यामुळे मृतांची संख्याही वाढली आहे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी निम्म्या लोकांना अद्याप कोरोना लस मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका आहे. जगभरात कोरोनामुळे एका वर्षभरात २५ लाख लोक मरण पावले. मात्र डेल्टा विषाणूमुळे मृतांचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले व पुढच्या २३६ दिवसांत  आणखी २५ लाख लोकांचा मृत्यू झाला. 

जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची दर आठवड्याची सरासरी काढली तर निम्मे मृत्यू अमेरिका, रशिया, ब्राझील, मेक्सिको, भारत या पाच देशांत होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या आठवड्यात कोरोनामुळे जगात दररोज सरासरी ८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच या संसर्गामुळे दर मिनिटाला पाच जणांनी आपला जीव गमावला.

अमेरिकेत फ्लूपेक्षा कोरोना घातकअमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४ कोटी ४४ लाखांवर पोहोचली असून तिथे ७ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत १९१८ व १९१९ मध्ये फ्लूच्या साथीत ६ लाख ७५ हजार जणांनी जीव गमावला होता. त्यापेक्षा तिथे कोरोना साथीत अधिक जण मरण पावले. जगात कोरोनामुळे अमेरिकेत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. सर्वात प्रगत व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेल्या अमेरिकेत कोरोना लस देण्याचे प्रमाणही अधिक आहे. मात्र तेथील सर्व गणिते डेल्टा विषाणूने बदलून टाकली. 

देशात आढळले २६ हजार नवे रुग्णगेल्या चोवीस तासांत भारतामध्ये कोरोनाचे २६,७२७ नवे रुग्ण आढळून आले असून, शुक्रवारपेक्षा या आकड्यात १३ टक्क्यांनी वाढ झाली. देशात ३ कोटी ३७ लाख ६६ हजार ७०७ कोरोना रुग्ण असून, त्यापैकी ३ कोटी ३० लाख ४३ हजार १४४ जण बरे झाले. गेल्या चोवीस तासांत २७७ जण या संसर्गाने मरण पावले. 

भारत-ब्रिटनमध्ये चर्चाभारताने दिलेल्या कोविशिल्ड लसीकरण प्रमाणपत्राला ब्रिटनमध्ये मान्यता देण्यासाठी दोन्ही देशांची चर्चा सुरू आहे, असे ब्रिटनने म्हटले आहे. याआधी अशी मान्यता नाकारणाऱ्या ब्रिटनला धडा शिकविण्यासाठी भारताने जशास तसे प्रत्युत्तर दिले होते. भारतामध्ये येणाऱ्या सर्वच ब्रिटिश नागरिकांना आता १० दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणात राहावे लागणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या