शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

CoronaVirus : जागतिक सहकार्याचा दृष्टिकोन मानवकेंद्रित ठेवा; पंतप्रधान मोदी यांचे जी-२० शिखर परिषदेत प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 05:38 IST

CoronaVirus : कोरोना रोगाच्या जगव्यापी साथीमुळे सार्वजनिक आरोग्यासोबत अर्थव्यवस्थेवर महासंकट ओढवले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीने जगावर ओढवलेले महासंकट पाहता आर्थिक उद्दिष्टांऐवजी जागतिक समृद्धी आणि सहकार्याचा दृष्टिकोन मानवकेंद्रित ठेवण्याची गरज आहे, असे आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० शिखर परिषदेत केले. वैद्यकीय संशोधन आणि विकासाच्या लाभाचे खुल्या दिलाने सहभागीदार होण्याचे तसेच अनुकूल, प्रतिसादात्मक आणि मानवी आरोग्यसेवा प्रणाली विकसित करण्याचे आवाहनही जी-२० देशांच्या शिखर परिषदेत केले.कोरोना रोगाच्या जगव्यापी साथीमुळे सार्वजनिक आरोग्यासोबत अर्थव्यवस्थेवर महासंकट ओढवले आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत जाण्यापासून वाचविण्यासाठी समन्वयातून कोणती ठोस पावले उचलणे जरूरी आहे, यावर जी-२० देशांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करीत महत्त्वाचे उपाय सुचिवले.शिखर परिषदेच्या समारोपानंतर जी-२० नेत्यांनी निवदेन जारी करून कोरोना रोगाच्या साथीचा जागतिक समन्वयातून लढा करण्याचे, तसेच जागतिक अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी, व्यापार विस्कळीत होण्याचे प्रमाण कमी राखत जागतिक सहकार्याचे आवाहन केले.सौदी अरेबियाने जी-२० ची विशेष शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौदी अरब नरेशांना धन्यवाद दिले. जी-२० व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जग कोरोनामुळे आर्थिक आणि सामजिक पतनाने डगमगले आहे. या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी नवीन आपत्ती व्यवस्थापन पद्धत विकसित करणे जरूरी आहे. या साथीमुळे होणारे धक्कादायक परिणाम ध्यानात घेऊन शक्तिशाली देशांनी काम करावे, तसेच नव्या जगाच्या उभारणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी शक्तिशाली जी-२० देशांना केले.या शिखर परिषदेत कोरोना विषाणूंचे उगमस्थान किंवा चीनवर चर्चा करण्यात आली नाही. तथापि, या महासंकटाचा समन्वय आणि सहकार्याने मुकाबला करण्यावर विचारविनिमय करण्यात आला. कोरोना विषाणूंच्या प्रसारासाठी कोणावरही खापर फोडण्याचा प्रयत्न झाला नाही, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जी-२० देशांच्या नेत्यांनी या शिखर परिषदेत सहभाग घेतला.कोरोनाविरुद्ध जागतिक युद्ध छेडण्याचे आवाहनचीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरोनाविरुद्ध पूर्णत: जागतिक युद्ध छेडण्याचे आवाहन केले. विषाणू कोणतीही सरहद्द बघत नाही. आम्ही ज्याच्याशी लढत आहोत, तो आमचा शत्रू आहे. जगाने आजवर पाहिले नाही, अशा एकजुटीने काम करावे लागेल, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या साथीला आळा घालत लोकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते उपाय करण्याचे जी-२० देशांच्या नेत्यांनी मान्य केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी