शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

CoronaVirus News: रशियन लस मिळवण्यास भारत धोरण तयार करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 06:45 IST

टास्क फोर्सला घ्यायचेत महत्वाचे निर्णय

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी रशियन लस मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उच्चाधिकार टास्क फोर्स (समिती) धोरण निश्चित करेल. या फोर्सचे प्रमुख आहेत डॉ. व्ही. के. पॉल.अनेक सदस्य असलेल्या या समितीची बुधवारी बैठक झाली ती काही फक्त रशियन लस स्पुटनिक-व्हीची गुणवत्ता किती याचा अहवाल मोदी यांना देण्यासाठीच नाही तर ती लस किती प्रमाणात घ्यायची आणि त्यासाठीच्या निधीची व्यवस्था कशी असावी याबद्दलही होती.या समितीला महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे तो म्हणजे जगात वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादन होत असलेल्या इतर अनेक कोविड लशीही मिळवण्याबाबत. भारत सरकारने कोविड लशींवरील संशोधन आणि त्या विकसित करण्यासाठी कोणताही निधी दिलेला नाही. तीन पाश्चिमात्य आणि दोन चिनी अशा पाच लशी उत्पादनाच्या प्रगतीच्या टप्प्यावर आहेत. त्या सगळ्या गुणवत्तेच्या टप्पा ३ वर आहे.स्विडीश-ब्रिटिश औषध ग्रुप अ‍ॅस्ट्रा झेनिकासोबत काम करत असलेल्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीला येत्या सप्टेंबरअखेर निष्कर्ष निघण्याची आशा आहे तर यु. एस. नॅशनल इन्स्टिट्यूटस ऑफ हेल्थसोबत भागीदार असलेली अमेरिकेची बायोटेक कंपनी मोडेर्ना या वर्षअखेरचे (बहुधा नोव्हेंबर) लक्ष्य ठेवून आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने जवळपास १० अब्ज डॉलर्स सात लशी विकसित करणाऱ्यांवर खर्च केले असून त्यापैकी पाच जणांशी जवळपास एक अब्ज मात्रा उत्पादनासाठी करार केले आहेत.जपानदेखील तीन पुरवठादारांशी वाटाघाटी करत आहे आणि ब्रिटनदेखील अशा उत्पादकांशी अशा प्रकारचे करार करत आहे.परंतु, भारत स्वत:च्या कोनव्हाक्सिनवर विसंबून आहे. ते भारत बायोटेक-आयसीएमआर आणि झायडस एकत्रितपणे उत्पादन करत आहे. अर्थात ती टप्पा-एक आणि टप्पा-२ चाचणीच्या पायरीवर आहे. टास्क फोर्सला रशियन लशीबाबत तातडीने भूमिका घ्यायची आहे कारण रशिया भारताचा मित्र देश आहे. या बैठकीला असलेली परराष्ट्र मंत्रालयातील सचिवाची उपस्थिती हेच दर्शवते की, भारत रशियन लस मिळवायचा प्रयत्न करेल. त्यासाठीची पद्धत अंतिम केली जात असल्याचे या सूत्रांनी सांगितले.एकत्रितपणे उत्पादनभारत स्वत:च्या कोनव्हाक्सिनवर विसंबून आहे. ते भारत बायोटेक-आयसीएमआर आणि झायडस एकत्रितपणे उत्पादन करत आहे. अर्थात ती टप्पा-एक आणि टप्पा-२ चाचणीच्या पायरीवर आहे. टास्क फोर्सला रशियन लशीबाबत तातडीने भूमिका घ्यायची आहे या बैठकीला असलेली परराष्ट्र मंत्रालयातील सचिवाची उपस्थिती हेच दर्शवते की, भारत रशियन लस मिळवायचा प्रयत्न करेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या