शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांची संख्या २४ लाखांहून अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:49 IST

६४ हजारांहून अधिक नवे रुग्ण : बरे झालेल्यांचे प्रमाण ७१ टक्के

नवी दिल्ली : देशात शुक्रवारी कोरोनाचे ६४,५५३ नवे रुग्ण आढळले असून, त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २४ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. त्यात दिलासा देणारी बाब ही की, या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या आता १७ लाखांपेक्षा जास्त आहे. कोरोनामुळे आणखी १००७ जण मरण पावल्याने बळींची एकूण संख्या ४८,०४० झाली आहे.देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २४,६१, १९० असून, पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या १७,५१,५५५ इतकी आहे. बरे झालेल्या व्यक्तींचे प्रमाण ७१.१७ टक्के झाले आहे, तसेच कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.९५ टक्के राखण्यात सरकारी यंत्रणांना यश आले आहे.देशात सध्या ६ लाख ६० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाने कोरोना रुग्णांचा २० लाखांचा टप्पा ७ ऑगस्ट रोजी ओलांडला होता.कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ५,३९७, दिल्लीत ४,१६७, कर्नाटकात ३,१६३, गुजरातमध्ये २,७३१, आंध्र प्रदेशमध्ये २,३७८, उत्तर प्रदेशमध्ये २,२८०, पश्चिम बंगालमध्ये २,२५९ व मध्यप्रदेशमध्ये १,०६५ इतकी आहे. अन्य काही राज्ये व कें द्रशासित प्रदेशांमध्येही कोरोनामुळे लोकांचा बळी गेला आहे. या आजारामुळे मरण पावलेल्यांपैकी ७० टक्के लोकांना एकाहून अधिक व्याधी होत्या.कोरोना चाचण्यांची एकूण संख्या २ कोटी ७६ लाखइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी ८,४८,७२८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशभरात कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता २ कोटी ७६ लाखांहून अधिक झाली आहे.दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण १० लाखांपर्यंत नेण्याचे केंद्र्राने ठरविले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यांचे सहकार्य लाभत आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढल्यानंतर अधिकाधिक रुग्णांना शोधून वेळीच उपचार केल्यास साथीवर नियंत्रण ठेवता येईल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या