शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनानं लष्करातील जवानही संक्रमित; देशातील रुग्णांची संख्या 140वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 08:44 IST

दिल्लीपासून केरळपर्यंत पसरलेल्या या रोगानं पश्चिम  बंगालमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोलकात्यात कोरोना संक्रमित पहिला रुग्ण आढळला आहे.

नवी दिल्लीः देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढत होताना दिसत आहे. भारतातील रुग्णांची संख्या 140पर्यंत पोहोचली आहे. दिल्लीपासून केरळपर्यंत पसरलेल्या या रोगानं पश्चिम  बंगालमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोलकात्यात कोरोना संक्रमित पहिला रुग्ण आढळला आहे. त्याशिवाय भारतीय लष्करातील एक जवानही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदर्शनास आलं आहे. कोलकात्यात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला असून, तो रुग्ण लंडनवरून परतला आहे. रुग्णाला बालीघाटमधल्या आयडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोना व्हायरसचं हे पहिलंच प्रकरण आहे. ब्रिटनवरून परतलेला हा रुग्ण कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्या रुग्णाचे आई-वडील आणि त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. 18 वर्षांचा हा तरुण 15 मार्च रोजी ब्रिटनवरून परतला होता. आता त्या तरुणासह आई-वडील आणि चालकाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.  लडाखमधला जवान पॉझिटिव्हकोरोना व्हायरसच्या विळख्यात सामान्य व्यक्तीही सापडत आहेत. परंतु भारतात पहिल्यांदाच एका जवानाला कोरोनाची लागण झाली आहे. लडाखमधला हा जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जवानासंबंधी अधिक माहिती मिळालेली नाही. परंतु त्या जवानाचे आईवडील इराणवरून परतले होते. दुसरीकडे राज्यात कोरोना विषाणूचा पहिला बळी गेला आहे. दुबईहून परतलेल्या एका ६३ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई आणि पिंपरी-चिंचवड येथे प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 41 झाली आहे.

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली असून गेल्या दोन दिवसांत इराण येथून लष्कराने 289 भारतीयांना परत आणले आहे. या वेलनेस सेंटरमधील जवळपास 20 हॉलमध्ये या सर्वांवर लष्कराचे डॉक्टर उपचार करत आहे. चीन, इटली, अमेरिका, इराण, स्पेन आदी देशांत कोरोनाचा कहर सुरू असताना भारतातील परिस्थिती मात्र बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही समाधान व्यक्त केले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या