शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ...अन् 'त्या' अस्वस्थ मूर्तिकारानं मंदिरातच स्वत:ची जीभ कापून घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 07:22 IST

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील मंदिरात स्वत:ची जीभ कापली

पालनपूर (गुजरात) : लॉकडाऊनमुळे निराश होऊन घरी जाण्यास आतुर झालेल्या विवेक शर्मा (२४, रा. मोरेना, जिल्हा, मध्यप्रदेश) या मूर्तिकाराने गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील मंदिरात स्वत:ची जीभ कापून घेतली, असे पोलिसांनी सांगितले. काही वृत्तांमध्ये त्याने देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी जीभ अर्पण केली, असा दावा केला असला तरी पोलिसांनी त्यांना दुजोरा दिलेला नाही.‘नादेश्वरी खेड्यातील नादेश्वरी माताजी मंदिरात शनिवारी शर्मा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत होता. त्यावेळी त्याच्या हातात कापलेली जीभ होती. आम्ही त्याला तातडीने सुई गाम रुग्णालयात नेले,’ असे पोलीस म्हणाले. ज्या मंदिरात हा प्रकार घडला त्या मंदिराची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे आहे.शर्मा हा तेथून १४ किलोमीटरवरील मंदिरात कामाला आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत विवेक शर्मा हा लॉकडाऊन लागू झाल्यापासून कमालीचा अस्वस्थ झाला होता आणि त्याला सतत घराची आठवण येत होती. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने म्हटले की, ‘शर्मा याने असा विचार केला असावा की, देवतेला जीभ अर्पण केल्यास परिस्थिती बदलेल व आपल्याला घरी जाता येईल.’ मात्र, पोलिसांनी शर्मा जोपर्यंत शुद्धीवर येत नाही व नेमके काय घडले, हे सांगणार नाही, तोपर्यंत जीभ अर्पण केल्याचा दावा मान्य करता येणार नाही, असे स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या