शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Coronavirus: कोरोनाला थोपवण्यासाठी 'हे' औषध ठरणार निर्णायक; मोदी सरकारनं निर्यातच थांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 16:44 IST

केंद्रातल्या मोदी सरकारनं हायड्रोक्सीक्लोरिन औषधाची निर्यात थांबवली आहे. तसेच या औषधाच्या केमिकलपासून बनवलेल्या इतर औषधांच्या निर्यातीवरही बंदी लादण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांच्या उपचारामध्ये हायड्रोक्सीक्लोरिन हे मदतगार ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रातल्या मोदी सरकारनं हायड्रोक्सीक्लोरिन औषधाची निर्यात थांबवली आहे. केंद्रीय उद्योगिक आणि व्यावसाय मंत्रालयाच्या अंतर्गत कामकाज पाहणारे प्रमुख संचालक, विदेश व्यापार (डीजीएफटी)कडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, सरकार जनतेला यापासून वाचवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे. कोरोनाग्रस्तांच्या उपचारामध्ये हायड्रोक्सीक्लोरिन हे मदतगार ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रातल्या मोदी सरकारनं हायड्रोक्सीक्लोरिन औषधाची निर्यात थांबवली आहे. तसेच या औषधाच्या केमिकलपासून बनवलेल्या इतर औषधांच्या निर्यातीवरही बंदी लादण्यात आली आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणीही करण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक आणि व्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत कामकाज पाहणारे प्रमुख संचालक, विदेश व्यापार (डीजीएफटी)कडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. काही अटींच्या आधारवर या औषधांच्या निर्यातीवर सूट आहे. केंद्र सरकारनं या औषधांच्या निर्यातीवर तीन अटींच्या आधारे सवलत देण्याची तरतूद केली आहे. तीन अटींवर सूट देण्याची तरतूद>>कोणत्या एका विशिष्ट प्रकारच्या निर्यातदाराला आधीच संबंधित युनिटची निर्यात करण्याचं आश्वासन दिलेलं असेल,  तसेच अडवान्स लायसन्सच्या दायित्वातून मागणीनुसार त्याची पूर्तता करावी लागणार आहे. >>निर्यातबंदीची अधिसूचना मिळण्याच्या आधी त्याने इरिवोकेबल लेटर ऑफिस क्रेडिट किंवा आयसीएलसी मिळवलेलं असल्यास निर्यातदाराला ही द्यावी लागणार आहेत. >>जर भारत सरकार कोणत्याही देशाला या रसायनांच्या निर्यात करण्यास इच्छूक असल्यास  त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज नाही.देशात औषधाची चणचण म्हणून लादले निर्बंध गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, आजमितीस या रोगावर कोणतंही औषध किंवा लस सापडलेली नाही. पण हायड्रोक्सीक्लोरिन औषधाचा कोरोनाग्रस्त रुग्णावर चांगला प्रभाव पडत असल्याचंही समोर आलं आहे. त्यातून डॉक्टरांनाही एक आशेचा  किरण दिसला आहे. या केमिकलचा तुटवडा भासू नये म्हणून भारतानं या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी