शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : उत्तम नाश्ता, जेवण आणि पुस्तकेही; केरळमध्ये व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 06:55 IST

आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वा तशी शक्यता असल्याचे कळताच अनेक जण हबकून जात आहेत.

कोची : आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वा तशी शक्यता असल्याचे कळताच अनेक जण हबकून जात आहेत. अनेक संशयित रुग्णांना विविध रुग्णालयांतील विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. तिथे कसे वातावरण असेल, काय व्यवस्था असेल, तिथे नीट जेवणखाण मिळेल का, नीट वागविले जाईल का, अशी भीती हा संसर्ग न झालेल्यांनाही दिसत आहे.पण केरळ सरकारने राज्यातील १७ संशयित रुग्णांसाठी इतकी उत्तम व्यवस्था केली आहे की त्यामुळे आपण लवकरच ठणठणीत बरे होऊ , अशी खात्री तेथील सर्व रुग्णांना वाटू लागली आहे.कोची शहरातील सरकारी रुग्णालयात या १७ सशंयीत रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी १५ जण स्थानिक असून, दोन जण ब्रिटनचे नागरिक आहेत.केरळचे रहिवासी असलेल्या १५ जणांना रोज सकाळी नाश्त्यामध्ये डोसा, इडली, दोन अंडी, संत्री, मिनरल वॉटरची बाटली देण्यात येते. दोघा ब्रिटिश नागरिकांना आॅम्लेट, टोस्ट, ज्यूस, सूप देण्यात येते.त्यानंतर दुपारच्या जेवणात भारतीयांना चपात्या, मासे, भाज्या, भात, डाळ, दही असते, ब्रिटिश नागरिकांना चीज टोस्ट, अननसाचा ज्यूस, विविध फळे देण्यात येतात.पुन्हा तीन वाजता चहा, बिस्किटे, मेदुवडा, बनाना फ्राय असा नाश्ता असतो. ब्रिटिश नागरिकांना ज्यूस आणि विविध प्रकारची बिस्किटे असतात. रात्री जेवणामध्ये अप्पम, व्हेजिटेबल स्ट्यू, केळी, मिनरल वॉटर असते. परदेशी नागरिकांना टोस्टेड ब्रेड, स्क्रॅम्बल्ड एग्ज, फळे आणि मिनरल वॉटर दिले जाते. (वृत्तसंस्था)वृत्तपत्रे, मोबाइल अन् कुटुंबियांशी गप्पाया साऱ्या व्यवस्थेमुळे आपण आजारी आहोत, असे त्या १३ जणांना वाटत नाही. त्याशिवाय या सर्व संशयित रुग्णांना रोज मल्याळम व इंग्रजी वृत्तपत्रे वाचायला दिली जातात. त्याशिवाय त्यांना विचारून काही पुस्तकेही वाचण्यासाठी पुरवली जातात. याशिवाय या सर्वांना मोबाइल वापरायची परवानगी आहे. त्यामुळे ते आपल्या कुटुंबीयांशी, मित्रमंडळींशी गप्पा मारू शकतात आणि व्हिडीओ कॉलही करू शकतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळ