शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : राज्य सरकारांना बळ आणि थकित जीएसटी द्या, राहुल गांधींचा मोदींना सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 16:39 IST

पंतप्रधानांनी कोरोनाविरोधातील लढाईत राज्य, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना अधिकचे अधिकार दिले पाहिजेत.

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या होत असलेल्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी केलेल्या अपुऱ्या उपाय योजनांवरून केंद्रातील  मोदी सरकारला टोला लगावला आहे. तसेच कोरोनाविरोधातील लढाईत मोदींनी राज्य सरकारांना बळ आणि थकित राहिलेली जीएसटीची रक्कम द्यावी, असा सल्ला दिला आहे.   आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, राहुल गांधी पुढे म्हणाले की, 'लॉकडाऊनमुळे देशामध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधानांनी कोरोनाविरोधातील लढाईत राज्य, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना अधिकचे अधिकार दिले पाहिजेत. तसेच केंद्राने राज्यांना पैसे दिले पाहिजेत. तसेच केंद्राने राष्ट्रीय स्तरावर काम केले पाहिजे आणि राज्यांना आपल्या क्षेत्रात निर्णय घेण्याचे अधिकार दिले पाहिजेत.''

कोरोनाविरोधातील लढाई ही वरून खाली नव्हे तर तळापासून वरपर्यंत लढली गेली पाहिजे.कोरोनाविरोधातील लढाई राज्य आणि जिल्हा स्तरावर आहे. केरळमध्ये खालच्या पातळीवर योग्यप्रकारे काम झाले. कोरोनाविरोधातील ही लढाई खालून वरपर्यंत लढण्याची आहे. सध्या पंतप्रधानांनी राज्यांच्या निधिकडे लक्ष द्यावे' असे राहुल गांधींनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव उपाय नसल्याचेही राहुल गांधींनी सांगितले. ते म्हणाले की, 'कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात आज गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र केवळ लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्याचा एकमेव उपाय नाही. लॉकडाऊनमुळे कोरोना केवळ थांबून राहील. संपणार नाही. लॉकडाऊन हटवल्यानंतर कोरोना पुन्हा पसरेल. त्यामुळे कोरोनाला रोखायचे असेल तर कोरोना संशयितांच्या अधिकाधिक चाचण्या घेणे हाच उपाय आहे. त्यामुळे सरकारने या चाचण्या घेतल्या पाहिजेत.'

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या