शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाचा कहर, माझ्या १ महिन्याच्या बाळाला पिण्यास दूध नाही, देहविक्री करणाऱ्या महिलेची व्यथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 19:03 IST

CoronaVirus : 2 हजारहून अधिक देहविक्री महिलांसह मुलं रस्त्यावर फसली

ठळक मुद्देजीबी रोडवर जवळपास 4 हजारहून अधिक वेश्या काम करतात.हजारो वेश्यांसह 200 हून अधिक मुले आहेत. यापैकी जवळपास ५० मुले १ महिन्यापासून ते १ वर्ष वयोगटातील आहेत.

नवी दिल्ली - भारतात देहविक्रीवर बंदी आहे. मात्र, काही शहरांमध्ये रेड लाईट एरिया आहेत. अजमेर गेटपासून लाहौरी गेटपर्यंतच्या 1 ते 2 किमी परिसरातील जीबी रोडवरील सुरू असलेल्या देहविक्री भागास भारतातील सर्वात मोठा रेड लाईट परिसर म्हणून ओळखला जातो. 100 हून अधिक वेश्याबाजार या रोडवर चालतो. येथे रस्त्यांवरील दुकानाच्या छतावर देहव्यापर केला जातो. जीबी रोडवर जवळपास 4 हजारहून अधिक वेश्या काम करतात.

 

आता कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जारी केल्याने हजारो मजूर पायपीट करून आपल्या घराच्या दिशेने पलायन केले आहे. काही लोक असे ही आहेत ज्यांची राहण्याची काहीच सोय नाही. अशातच जीबी रोडवरील 2000 हून अधिक वेश्या एकाच ठिकाणी बंद आहेत. लॉकडाऊनमुळे वेश्या व्यवसाय बंद करण्यात आला आहे.

 

कोरोनाशी लढण्यासाठी स्वच्छ ठिकाणी राहा आणि सोशल डिस्टनसिंग ठेवण्यास सांगितले जात आहे. मात्र, वेश्या महिलांची स्थिती याउलट पाहायला मिळत आहे. जीबी रोडवरील काम करणाऱ्या एका वेश्या महिलेने इंडिया टूडेला माहिती दिली की, आम्ही इतक्या घाणेरड्या आणि प्रकाश नसलेल्या ठिकाणी अडकलो आहोत. आमच्या समस्यांकडे अधिकाऱ्यांनी आधीपासून कानाडोळा केला आहे. आम्ही किराणा सामान आणि औषध आणण्यास देखील खाली उतरू नाही शकत. आमच्यातील बरयाच महिला आजारी आहेत. पण आम्ही डॉक्टरकडे जाऊ शकत नाही. तसेच डॉक्टरांना फोन करून बोलावू पण शकत नाही. पोलिसही आमचं ऐकत नाही आणि आमच्याकडील पैसे आता संपत आले आहेत. 

गरीबीपासून बचाव करण्यासाठी येथे काम करणारे अनेक देहविक्री करणाऱ्या रेड लाईट क्षेत्रात आले आहेत. पण आता व्यवसाय ठप्प झाला आहे. आता मी स्वत: कुठेही जाऊ शकत नाही. हजारो वेश्यांसह 200 हून अधिक मुले आहेत. यापैकी जवळपास ५० मुले १ महिन्यापासून ते १ वर्ष वयोगटातील आहेत. ज्यांना पुरेसे अन्न, मास्क आणि इतर महत्वाच्या गोष्टीशिवाय जगावं लागत आहे.मंजरी (नाव बदलले आहे) ही एक वेश्या आहे. तिला आपल्या एका महिन्याच्या बाळासाठी येथे परत यावे लागले. ती झारखंडच्या बाहेरील एका छोट्याशा खेड्यातील आहे. 30 वर्षांची मंजरी 21 वर्षांची होती तेव्हा तिला वेश्याव्यापारात ढकलले गेले. तेव्हापासून ती वेश्याबाजारात राहात आहे. त्यांनी आज टाक / इंडिया टुडेला सांगितले की, कोरोना आजारामुळे आपल्यातील बरेचजण आपापल्या घरी निघून गेले होते. परंतु लॉकडाऊनमुळे आम्हाला परत यावे लागले. मंजरी म्हणतात "लॉकडाउन जाहीर होताच मालकांनी आम्हाला सोडले, आम्हाला काही व्यवस्थित सांगितले नाही. आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत. आमच्याकडे फारच कमी अन्न आहे बाकी आहे. जे आपापसात वाटून घेत आहोत. माझ्या एका महिन्याच्या बाळाला पिण्यास पुरेसे दूध नाही. काही समाजसेवक आम्हाला मदत करत आहेत. आम्ही देखील माणसं आहोत. सरकार आम्ही काळजी घेतली नाही तर आम्ही भुकेने मरू " 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNew Delhiनवी दिल्लीProstitutionवेश्याव्यवसाय