शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना लस विकत घेण्यासाठी विकसनशील देशांना १२ अब्ज डॉलर; जागतिक बँकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 06:48 IST

World Bank News: रुग्णांच्या उपचारांसाठीही मदत करणार, कोरोना विषाणूच्या साथीला तोंड देण्यासाठी १६० अब्ज डॉलरचा निधी खर्च करण्याची जागतिक बँकेची मूळ योजना आहे.

वॉशिंग्टन : कोरोना प्रतिबंधक लस विकत घेण्यासाठी, तसेच या रुग्णांवरील उपचारांसाठी जगभरातील विकसनशील देशांना १२ अब्ज डॉलरचा निधी जागतिक बँक देणार आहे. निधीचा हा निर्णय जागतिक बँकेच्या संचालक मंडळाने मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला.कोरोना विषाणूच्या साथीला तोंड देण्यासाठी १६० अब्ज डॉलरचा निधी खर्च करण्याची जागतिक बँकेची मूळ योजना आहे. त्यातील काही रक्कम विकसनशील राष्ट्रांना सध्या देण्यात येणार आहे. मदत केल्या जाणाऱ्या देशांना केवळ पैसेच नाहीत, तर अद्ययावत तंत्रज्ञानही पुरविले जाईल. त्यामुळे ते देशातच मोठ्या प्रमाणावर लसीचे उत्पादन करू शकतील. प्रतिबंधक लसीला मोठी मागणी येणार असून, ती पूर्ण करण्यासाठी कंपन्यांनी सज्ज असावे.कोरोना प्रतिबंधक लसीचा शोध लागला, तर त्या लसीचे जगातील सर्व देशांत समन्यायी वाटप होईल का, याविषयी विकसनशील देशांनी वारंवार चिंता व्यक्त केली आहे.अमेरिका, युरोप आदी देशांनीच लसीसाठी इतकी मोठी मागणी नोंदविली आहे की, इतर देशांतील कोरोनापीडित रुग्णांना ही लस लवकर मिळणे अशक्य आहे, अशी भीती आशिया, आफ्रिकातील काही देशांनी बोलून दाखविली होती. जागतिक बँकेने कोरोना लस विकत घेण्यासाठी, तसेच तिच्या वितरणासाठी १२ अब्ज डॉलरचा निधी देण्याचा जाहीर करून त्या देशांना दिलासा दिला आहे.दोन कंपन्यांकडून चाचण्या स्थगित

  • अमेरिकेतील इली लिली या औषध कंपनीने रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांवर करावयाच्या मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्याचे प्रयोग अज्ञात कारणामुळे स्थगित केले आहेत.
  • त्याच्या काही तास आधी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने आपल्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्यातील प्रयोग स्थगित करण्यात आले होते.
  • या प्रयोगात सहभागी झालेल्यांपैकी एक स्वयंसेवक आजारी पडला असून, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्याला नेमका काय आजार झाला आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. प्रयोग तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने सांगितले. 
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld Bankवर्ल्ड बँक