शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : इंदूरमध्ये पुन्हा आरोग्य पथकावर हल्ला, गुन्हेगाराकडून दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 16:23 IST

CoronaVirus : कोरोनावर मात करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना इंदूरमध्ये पुन्हा मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

इंदूर : देशात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्येही कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते. या कोरोनावर मात करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना इंदूरमध्ये पुन्हा मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकावर एका गुन्हेगाराने दगडफेक केली. तसेच, त्यांच्याकडील मोबाईलची तोडफोड केली. या घटनेनंतर आरोग्य कर्मचारी थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि याबाबत तक्रार दाखल केली आहे. 

या सर्व्हे पथकात डॉक्टर, शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्ते सामील होते. सर्व्हेचे प्रभारी आणि आयुर्वेदिक डॉक्टर प्रवीण चौरे यांनी या घटनेबाबत दुजोरा दिला आहे. प्रवीण चौरे यांनी सांगितले की, "पलसिया भागातील विनोबानगरमध्ये आमचे पथक सर्व्हे करण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी पारस यादव या गुन्हेगाराने आमच्या पथकावर हल्ला केला. यादरम्यान या भागातील काही लोक पथकाचा बचाव करण्यासाठी आले. मात्र, पारस यादवने त्यांच्यावरही हल्ला केला. आमच्या पथकावर त्याने दगडफेक केली आहे. तसेच, त्याने पथकातील एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मोबाईल फोन तोडला आहे." 

पारस यादव नावाचा गुन्हेगार राहत असलेल्या विनोबा नगरमधील ही घटना आहे. यापूर्वी त्याच्यावर दारू  विकल्याचा आरोप आहे. पारस यादव ज्यावेळी शेजार्‍यांशी भांडत होता. त्यावेळी त्याठिकाणी सर्वेक्षण करण्यासाठी गेलेले आरोग्य पथक मोबाईलवरुन त्यांचे काम करत होते. मात्र, पारस यादवला वाटले की हे लोक व्हिडिओ काढत आहेत. त्यानंतर त्याने आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली आणि त्यांचा मोबाइल तोडला. या घटनेनंतर आरोग्य कर्मचार्‍यांनी पोलिसांना माहिती दिली, असे पलासियाचे टीआय विनोद दीक्षित यांनी सांगितले.

दरम्यान, याआधीही कोरोनाविरोधात लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर इंदूरमध्ये हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश