शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी न्यायालयांचा पुढाकार; न्यायाधीशांनी दिला महिन्याचा पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 04:50 IST

मद्रास उच्च न्यायालयाचे न्या. एस.एम. सुब्रमण्यम यांनी त्यांचा एक महिन्याचा २.२५ लाख पगार कोरोनामुळे झळ बसणाऱ्या असंघटित कामगारांसाठी दिला आहे.

- खुशालचंद बाहेती 

नवी दिल्ली : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन पातळीवर अनेक उपाययोजना होत असतानाच देशातील अनेक उच्च न्यायालयांनीही यात पुढाकार घेतला आहे. देशभरातील न्यायालयांत फक्त तातडीची कामे आणि ठराविक काळासाठी यापूर्वीच सुरू झाली आहेत.मद्रास उच्च न्यायालयाचे न्या. एस.एम. सुब्रमण्यम यांनी त्यांचा एक महिन्याचा २.२५ लाख पगार कोरोनामुळे झळ बसणाऱ्या असंघटित कामगारांसाठी दिला आहे.केरळ उच्च न्यायालयाने दारू दुकानावरील गर्दी कमी करण्यासाठी घरपोच दारू पुरवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. याशिवाय याचिकाकर्त्यास ५० हजारांचा दंड करताना न्यायालयीन कर्मचारी संसर्गाचा धोका पत्करून काम करीत असताना, अशी याचिका दाखल करणाºयास धारेवर धरले.मद्रास उच्च न्यायालयाने राज्यात सर्व धरणे, निदर्शने, आंदोलनांना बंदी केली आहे. राज्यांचा सल्ला न मानणाऱ्यांविरुद्ध कारवाई आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. आंदोलकांच्या हक्कांपेक्षा नागरिकांचा हक्क महत्त्वाचा आहे, असे न्या. एम.एम. सुंदरेश व कृष्णन रामास्वामी यांनी म्हटले आहे. गुजरात न्यायालयानेही लोकांनी अनावश्यक जमा होणे, प्रवास करणे, कार्यक्रम, पार्ट्या रद्द केल्याशिवाय प्रयत्नांना यश येणार नाही, असे मत व्यक्त केले. झारखंड उच्च न्यायालयाने लोकांविरुद्ध सक्तीची कारवाई सध्या करू नये. यामुळे याचिकाकर्त्यांची संख्या कमी होऊ शकेल, असे आदेश राज्याला दिले आहेत.पाटणा उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. देशातील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही पहिलीच व्हीसीद्वारे सुनावणी होती. न्यायाधीश यांनी निजी कक्षात बसून व कोर्ट हॉलमध्ये मोठा स्क्रीन लावून ही सुनावणी घेण्यात आली.महानगरपालिकांना दिल्या सूचनामुंबई उच्च न्यायालयात तातडीच्या म्हणून दाखल होणाºया अनेक याचिकांमध्ये महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाई, पाडकाम, जप्त मालमत्तांचा लिलाव यासंबंधी आहेत.याची दखल घेत उच्च न्यायालयाचे न्या. एस.जे. कथावाला आणि आर. आय. छागला यांनी कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत अपवाद वगळता, अशी सर्व प्रकरणे स्थगित ठेवावीत, अशा सूचना सर्व महानगरपालिकांना दिल्या आहेत.मुंबई उच्च न्यायालयात आॅनलाईन सर्क्युलेशन मागण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे अत्यंत तातडीच्या प्रकरणातच न्यायालय सुनावणी घेते. याचा परिणाम म्हणजे न्यायालयात मोजके व आवश्यक तितकेच लोक उपस्थित राहतात व गर्दी होत नाही.-अ‍ॅड. डी.आर. काळे,शासकीय अभियोक्ता, उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद

टॅग्स :Courtन्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या