शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मद्यप्रेमींसाठी खूशखबर! 'या' दोन राज्यांत आजपासून उघडली दारूची दुकानं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 17:07 IST

अनेक राज्य सरकारं दारू विक्री सुरू करायची की नाही, यासंदर्भात विचारात पडली आहेत.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला असून, उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन वाढवायचा की काढायचा याचा निर्णय 130 कोटी देशवासीयांना सांगणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वच दुकानं बंद असल्यानं मद्यप्रेमींचा हिरमोड झाला आहे. अनेक राज्य सरकारं दारू विक्री सुरू करायची की नाही, यासंदर्भात विचारात पडली आहेत. हरियाणामध्ये लॉकडाऊन असूनही दारूविक्री सुरूच आहे. केरळमधील आत्महत्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सल्ल्यानं दारू पिण्याचा सल्ला देण्यात आला होता. दारूच्या दुकानांतून सरकारला महसूलही मोठ्या प्रमाणात मिळतो.दरम्यान, आसाम आणि मेघालय या दोन ईशान्यकडच्या राज्यांनी सोमवारपासून दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, आसामच्या उत्पादन शुल्क विभागाने सोमवारपासून दारूची दुकाने, गोडाऊन, बाटल्यांचे कारखाने, दारूभट्टी उघडण्यास परवानगी दिली आहे. या काळात बीअर बार पूर्णपणे बंद राहतील. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दारूची दुकानं उघडी  राहतील. दुकानांमध्ये कमीत कमी कर्मचार्‍यांसह काम करण्याचे आणि बाटल्या किंवा रोख रक्कम घेताना ग्राहक व कर्मचार्‍यांना हाताला सॅनिटायझर लावावे किंवा हात स्वच्छ धुण्यास सांगण्यात आले आहे. बाटल्यांचे कारखाने, दारूभट्टीवर दारू बनविणारे आणि डिस्टिलर यांना त्यांच्या ठरावीक कर्मचाऱ्यांबरोबरच फक्त 50 टक्के कामगारांच्या उपस्थितीत काम करावे लागेल. त्यांना आपल्या कर्मचार्‍यांना आवारात किंवा जवळपासच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी लागेल. लॉकडाउन सुरू झाल्यापासून देशी दारूचे अवैध उत्पादन व विक्री अनेक पटीने वाढल्याचे एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अधिकृत दुकाने उघडण्यास परवानगी न दिल्यास बेकायदेशीररीत्या मद्यपान करून लोकांचा मृत्यू ओढावण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे भारतासह जगाचा एक तृतीयांश भाग लॉकडाऊनमध्ये आहे. भारतात कोरोना संक्रमणाची संख्या नऊ हजारांच्या वर पोहोचली आहे.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 35 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9152 आहे. यापैकी 7987 पॉझिटिव्ह आहेत, तर 856 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे आणि आतापर्यंत 308 लोकांचा मृत्यू झाला आहे. आज नागालँडमध्ये कोरोना पॉझिटिव्हची पहिली घटना समोर आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात 82, उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये 30, गुजरातमध्ये 22, मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये 22, कर्नाटकात 15, आंध्र प्रदेशात 12, राजस्थानमधील 11 आणि मुंबईतील धारावीत आज चार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या