शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: पोलिसांनी रोखल्यानं प्राणघातक हल्ला; अधिकाऱ्याचा हात केला शरीरापासून वेगळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 12:30 IST

Coronavirus लॉकडाऊन उल्लंघन करताना रोखल्यानं पोलिसांवर प्राणघातक हल्ला

चंदिगढ: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. या लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरुन कर्तव्य पार पाडत आहेत. नागरिकांनी कारण नसताना घराबाहेर पडू नये, घरातच सुरक्षित राहावं, यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत. मात्र असं असताना पोलिसांवरच हल्ले होत असल्याच्या घटना देशाच्या काही भागांमध्ये घडत आहेत. पंजाबच्या पटियालामध्ये पोलिसांवर आज सकाळी प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती मोठ्या कौशल्यानं हाताळत असल्याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचं कौतुक होत आहे. मात्र त्यांच्याच पटियाला शहरात लॉकडाऊन उल्लंघनाच्या घटना दररोज घडत आहेत. पटियालाच्या भाजी मंडईत असाच एक धक्कादायक प्रकार आज सकाळी घडला. भाजी मंडईत जाताना रोखल्यानं निहंग शीखांनी पोलिसांवर तलवारीनं हल्ला केला. त्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा हात कापला गेला.निहंगांचा (परंपारिक हत्यारं ठेवणारे आणि लांब कुर्ता घालणारे शीख) एक गट आज सकाळी पांढऱ्या कारमधून भाजी मंडईत आला. मंडी बोर्डच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेशद्वाराजवळ थांबवलं आणि कर्फ्यू पासबद्दल विचारणा केली. मात्र ते थेट बॅरिकेडिंग तोडून पुढे गेले. पोलिसांनी त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर निहंगांनी गाडीतून बाहेर पडून पोलिसांवर हल्ला केला. त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा कापला गेला. या अधिकाऱ्याचा हात अक्षरश: शरीरापासून वेगळा झाला. निहंगांच्या हल्ल्यात आणखी दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या