शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

CoronaVirus: कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ; नव्या रुग्णांपैकी ६५% तबलिगी जमातशी संबंधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 20:06 IST

coronavirus नव्या ४८५ रुग्णांपैकी २९५ जण तबगिली जमातशी संबंधित

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांत देशातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगानं वाढ होत आहे. यातील निम्म्याहून अधिक जण निझामुद्दीनमधील मरकजमध्ये सहभागी झाले होते. आरोग्य मंत्रालयानं आज पत्रकार परिषदेत देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारी दिली. गेल्या दोन दिवसांत तबलिगी जमातशी संबंधित ६४७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. हे रुग्ण १४ राज्यांमधील आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यातील ५० टक्क्यांहून अधिक जण मरकजशी संबंधित आहेत.गुरुवारी रात्री पावणे बारापर्यंत देशात कोरोनाचे ४८५ नवे रुग्ण आढळून आले. यातील २९५ जणांनी मरकजमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे नव्या रुग्णांपैकी जवळपास ६५ टक्के रुग्ण मरकजशी संबंधित आहेत. गुरुवारपर्यंत एकट्या दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या २९३ इतकी होती. त्यातील १८२ जण मरकजशी संबंधित आहेत. मरकजला उपस्थित राहिलेल्या तिघांचा गेल्या २४ तासांत दिल्लीत मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ५६ जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. यातील कमीत कमी २० जण तबलिगी जमातशी संबंधित आहेत.शुक्रवारी तमिळनाडूत कोरोनाचे १०२ नवे रुग्ण आढळले. यातील १०० जण निझामुद्दीनमधील मरकजला उपस्थित होते. त्यामुळे तमिळनाडूतील कोरोनाबाधितांचा आकडा ४११ वर पोहोचला आहे. यातील ३६४ जण तबलिगी जमातशी संबंधित आहेत. मरकजला हजेरी लावणाऱ्या राज्यातल्या १२०० जणांना शोधण्यात यश आलं असून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती तमिळनाडूच्या आरोग्य सचिव बीला राजेश यांनी दिली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या