शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

CoronaVirus News: ...अन् 'त्या' चौघांना आणण्यासाठी मद्य व्यवसायिकानं भाड्यानं घेतलं १८० आसनी विमान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 20:11 IST

कुटुंबातील सदस्यांना भोपाळहून दिल्लीला आणण्यासाठी विमान भाड्यानं घेतलं

नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प झाल्यानं लाखो मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे मजुरांनी मिळेल त्या मार्गानं गावची वाट धरली. अनेक मजूर शेकडो किलोमीटरचा रस्ता तुडवत घराकडे निघाले. कडाक्याच्या उन्ह्यात चालणाऱ्या मजुरांची अवस्था पाहून अनेकांचं मन हेलावलं. एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसरीकडे एका मोठ्या व्यवसायिकानं त्याच्या कुटुंबातल्या चार सदस्यांना भोपाळहून दिल्लीला आणण्यासाठी १८० आसनी विमानं (एअरबस ए ३२०) भाड्यानं घेतलं. यामध्ये व्यवसायिकाची मुलगी, तिच्या दोन मुली आणि त्यांना सांभाळणाऱ्या महिलेचा समावेश होता. मद्य व्यवसायिक जगदीश अरोरा मध्य प्रदेशातल्या सोम डिस्टलरीजचे मालक आहेत. याबद्दल विचारणा केली असता, सुरुवातीला त्यांनी एअरबस भाड्यानं घेतल्याचं वृत्त फेटाळलं. मात्र त्यानंतर तुम्ही माझ्या खासगी आयुष्याबद्दल का विचारणा करत आहेत, असा प्रश्न केला. अरोरा यांनी भाड्यानं घेतलेल्या विमानानं सकाळी साडे नऊ वाजता दिल्लीवरून झेप घेतली. साडे दहा वाजता ते भोपाळला पोहोचलं. त्यानंतर चार प्रवाशांसह साडे अकरा वाजता विमानानं दिल्लीसाठी उड्डाण केलं.अशा प्रवासासाठी सहा आणि आठ आसनी चार्टर्ड विमानांचा पर्याय असतो. मात्र व्यवसायिकानं एअरबसचा पर्याय निवडला, अशी माहिती उड्डाण विभागातल्या सुत्रांनी दिली. श्रीमंत व्यक्ती कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी इतरांसोबत प्रवास करू इच्छित नाहीत. मात्र चार्टर्ड विमानानंदेखील हा उद्देश सफल सफल होऊ शकला असता, असं सुत्रांनी सांगितलं. एअरबस ए ३२०चं दर तासाचं भाडं ५ ते ६ लाख रुपये आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या