शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आता एका मिनिटात होईल 'या' अ‍ॅपद्वारे कोरोनाची चाचणी, दिल्ली-मुंबई एअरपोर्टवर टेस्टिंग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 11:27 IST

CoronaVirus : ASSAR ने आपल्या ‘इझ ऑफ डुइंग बिझनेस’ प्रोग्रामअंतर्गत 10 जुलै रोजी या प्रयोगाकरिता अर्ज घेण्यास सुरुवात केली असून सक्षम संस्थांसोबत स्क्रीनिंग प्रक्रियेस 25 जुलैपर्यंत मंजूरी देण्यात आली आहे.

 मुंबई : कोव्हिडच्या तिसऱ्या तीव्र आणि अपरिहार्य लाटेविषयी इंडियन मेडिकल असोसिएशनची वाढती चिंता आणि सतर्कता वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर, भारतातील आघाडीची टेक प्रोटोटायपिंग एजन्सी अ‍ॅडव्हान्स सर्व्हिस फॉर सोशल अँड अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्सने (ASSAR) 60 सेकंदात विश्वसनीय निकाल देणाऱ्या कोव्हिड 19 तपासणीकरिता,  तंत्रज्ञान, उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी, जागतिक तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत. 

दिल्ली आणि मुंबई या महत्त्वाच्या ठिकाणी व्यावसायिक पातळीवर प्रयोग करण्याकरिता हे चाचणी तंत्रज्ञान वापरले जाईल. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे, कोव्हिड विषाणूचे म्युटेशन असलेले विषाणू भारतात येण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या दोन आंतरराष्ट्रीय स्थळांवर लक्ष केंद्रीत करणे होय. तसेच राज्य सरकारांशी समन्वय साधत असे प्रयोग इतर 12 ठिकाणी वापरले जातील. देशांतर्गत आणि आंतराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरक्षित ठेवण्याकरिता, पुढील लाट आणि लॉकडाऊन होण्यापूर्वी त्याच पहिल्याच पायलट प्रकल्पाच्या कालावधीतया तपासण्या केल्या जातील. 

ASSAR ने आपल्या ‘इझ ऑफ डुइंग बिझनेस’ प्रोग्रामअंतर्गत 10 जुलै रोजी या प्रयोगाकरिता अर्ज घेण्यास सुरुवात केली असून सक्षम संस्थांसोबत स्क्रीनिंग प्रक्रियेस 25 जुलैपर्यंत मंजूरी देण्यात आली आहे. तसेच, शॉर्टलिस्ट केलेल्या कंपन्यांचे प्रयोग अंमलबजावणीकरिता ऑगस्ट 2021 मध्ये लॉजिस्टिकल आणि आर्थिक नियोजनाकरिता एजन्सीकडे जातील. "मागील 16 महिन्यात आपण अपेक्षेपेक्षा खूप काही गमावले आहे. कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेचा आपल्याला जबरदस्त फटका बसला असून आता देशाकडे आणखी सामाजिक-आर्थिक संकट झेलण्याची ताकद नाही," असे ASSAR एक्सप्रेसच्या इझ ऑफ डुइंग बिझनेस विभागाचे नॅशनल प्रोग्राम डायरेक्टर, आघाडीचे टेक्नोक्रॅट अभिजीत सिन्हा यांनी सांगितले.

याचबरोबर, या चाचणी तंत्रज्ञानाद्वारे, काही पूर्व तयारी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. जेणेकरून संभाव्य लाटेमुळे देशाला आणखी एका लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार नाही. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील अत्यावश्यक क्षेत्राने आधीच मोठे नुकसान सोसले आहे. या प्रयोगाद्वारे, अशा आवश्यक सेवांकरिता आपण स्वस्तात त्वरित चाचण्यांची सुविधा प्रदान करू शकू. नोकरी किंवा व्यवसायातील सर्वच क्षेत्रांमध्ये घरी बसून प्रभावीपणे काम करता येत नाही. विशेषत: राष्ट्रीय सुरक्षा, संशोधन, निर्मिती, विकसनशील क्षेत्र इत्यादी. त्यामुळे देशातील सामाजिक-आर्थिक सुधारणा पुन्हा पूर्वपदावर आणण्याचा या उपक्रमाद्वारे आम्ही प्रयत्न करत आहोत, असे अभिजीत सिन्हा म्हणाले. 

या कोव्हिड टेक पायलट प्रकल्पाच्या घोषणेद्वारे, एजन्सी आणि संस्थांमधील सर्व स्टेकहोल्डर्स एकत्र येतील. या प्रकल्पाच्या प्रारंभीच्या पात्रता निकषांमधील प्रमुख पैलू म्हणजे, ज्यांचे निकाल 60 सेकंदात त्वरित उपलब्ध होतील आणि ज्यात नवे म्युटेशन आणि कोव्हिड-19 विषाणूचे प्रकार शोधण्याची क्षमता आहे, असेच अर्ज प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. हा व्यावसायिक पायलट प्रकल्प असून मेडिकल प्रोटोटायपिंग नव्हे; त्यामुळे केवळ CMR / US-FDA / CE-IVD यांच्याद्वारे वैद्यकीयदृष्ट्या पूर्व-मंजूर केलेल्या तंत्रज्ञानानालाच पोर्टेबिलिटी, सहजता, किफायतशीरपणा, स्केलेबिलिटी, डेटा फसवणूक प्रतिबंधित करणे, इंटरनेट कनेक्टिव्हिटीसोबत ऑप्टिमायझेशन याबाबत प्रदर्शन करता येईल.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या