शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: विमानसेवा १७ मेपर्यंत बंदच; उत्पन्न नसताना पार्किंग, मेन्टेनन्सवर करावा लागतोय खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 07:23 IST

‘कोविड-१९’नामक महामारीमुळे जगात बहुसंख्या देशांत लागू झालेल्या लॉकडाऊनचा विमान इंडस्ट्रीला मोठा फटका बसला आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा रोखण्यासाठी पुकारलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. ३ मेनंतर लॉकडाऊन संपेल, असे अनेकांना वाटले होते. मात्र, १७ मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी केंद्र सरकारने वाढवल्याने त्याचा परिणाम विमानसेवेवरही झाला आहे.

लॉकडाऊनसंदर्भातील नव्या निर्णयानुसार, १७ मेपर्यंत विमानसेवा बंदच राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. परदेशातून देखील कोणतेही विमान भारतात येणार नसून, भारतातूनही परदेशात विमाने सोडली जाणार नाहीत, असे डीजीसीएने म्हटले आहे. मात्र, कार्गो फ्लाईट्स, मेडिकल सामानाची वाहतूक करणारी विमाने आणि विशेष सेवांसाठीची विमाने सुरु राहणार आहेत. जगातील अनेक देशांमध्ये भारताप्रमाणेच स्थिती आहे.

सगळीेच विमाने जमिनीवर असल्याने त्यांच्या पार्किंग आणि मेन्टेनन्सचा (देखभाल) प्रश्न निर्माण झाला आहे. सगळे व्यवहार पूर्ववत होतील, त्यावेळी विमान सुस्थितीत उड्डाण करू शकेल, अशी चांगल्या स्थितीत ते ठेवणे आवश्यक असल्याने मेन्टेनन्सचा खर्च मात्रकरावा लागत आहे. विमानांचे उड्डाण बंद असल्याने विमान कंपन्यांचे उत्पन्न थांबले आहे. मेन्टेनन्सचा खर्च मात्र रोज करावा लागत आहे.

तब्बल ३१४ बिलियन डॉलर्सचे नुकसान‘कोविड-१९’नामक महामारीमुळे जगात बहुसंख्या देशांत लागू झालेल्या लॉकडाऊनचा विमान इंडस्ट्रीला मोठा फटका बसला आहे. आजघडीला जगातील १६ हजारहून अधिक विमाने सध्या जमिनीवर आहेत. या विमानांना मेन्टेनन्सची आवश्यकता असून, ती ठेवायचीकुठे असाही प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थिती पूर्ववत होईल, तेव्हा ही विमाने कशी उड्डाणे भरतील, याबद्दलही साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक असोशिएशनने जाहीर केल्यानुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाउनमुळे संपूर्ण विमानसेवा ठप्प झाला आहे. यामुळे जगभरात विमानसेवेच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलात तब्बल ३१४ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी प्रचंड घट होणार आहे. हे नुकसान दरवर्षीच्या एकूण उत्पन्नाच्या ५५ टक्के असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या