शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

CoronaVirus : देशातील ९७ टक्के कोरोना रुग्ण झाले बरे; ३ लाख ८५ हजार उपचाराधीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 06:55 IST

CoronaVirus : केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३ कोटी २१ लाख ९२ हजार ५७६ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी १३ लाख ७६ हजार १५ जण बरे झाले आहेत.

नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांत ३६ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले व आणखी ४९३ जण मरण पावले. एकूण कोरोना रुग्णांपैकी सुमारे ९७.४७ टक्के लोक बरे झाले आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या वाढून ती ३ लाख ८५ हजारांवर पोहोचली आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३ कोटी २१ लाख ९२ हजार ५७६ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी १३ लाख ७६ हजार १५ जण बरे झाले आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३ लाख ८५ हजार ३३६ आहे. सर्व कोरोना रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १.२० टक्के आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीत गेल्या चोवीस तासांत आदल्या दिवशीपेक्षा २,३३७ ने वाढ झाली, तसेच ३५,७४३ रुग्ण बरे झाले. मागील ४९ दिवसांत दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या ५० हजारांपेक्षा कमी आहे. देशातील दररोजचा संसर्गदर १.८८ टक्के आहे. सलग वीस दिवस हा संसर्गदर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. दर आठवड्याचा संसर्गदर २ टक्के, तसेच कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.३४ टक्के आहे. आतापर्यंत ४ लाख ३१ हजार २२५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ७३ लाख ५० हजार ५५३ कोरोना लसीचे डोस देण्यात आले. आजवर ५८.३८ कोटी डोस नागरिकांना दिले आहेत. देशात चोवीस तासांत केरळमध्ये सर्वाधिक १९,४५१ नवे रुग्ण सापडले. त्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये ५,७८७, तामिळनाडूमध्ये १,९१६, कर्नाटकमध्ये १,६३२, आंध्र प्रदेशमध्ये १,५३५ नवे रुग्ण आढळले. नव्या रुग्णांपैकी ८४.०३ टक्के रुग्ण या पाच राज्यांत आहे. त्यातील ५३.९१ टक्के नवे रुग्ण एकट्या केरळमध्ये आहे.

जगात २० कोटी ७५ लाख कोरोना रुग्णजगभरात २० कोटी ७५ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील १८ कोटी ६० लाख रुग्ण बरे झाले. १ कोटी ७१ लाख जणांवर उपचार सुरू आहेत व त्यातील १ लाख ६ हजार जणांची प्रकृती गंभीर आहे. अमेरिकेमध्ये ३ कोटी ७४ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील ६६ लाख जणांवर उपचार सुरू आहेत, तसेच ६ लाख ३७ हजार लोकांचा बळी गेला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस