शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

coronavirus: देशभरात एका दिवसात ८३,८८३ नवे रुग्ण, बाधित ३८ लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 06:15 IST

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.७५ टक्के इतका कमी राखण्यात सरकारला यश आले आहे. हा जगातील सर्वात कमी मृत्यूदर आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये गुरुवारी कोरोनाचे ८३,८८३ नवे रुग्ण आढळून आले असून, हा आजवरचा उच्चांक आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ३८ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७७ टक्क्यांहून अधिक असून, अशा व्यक्तींची संख्या २९ लाखांहून जास्त झाली आहे.कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३८,५३,४०६ झाली असून, बरे झालेल्यांची संख्या २९,७०,४९२ इतकी आहे. या आजारामुळे आणखी १,०४३ जण मरण पावले असून, त्यामुळे बळींची एकूण संख्या ६७,३७६ झाली आहे. बळी गेलेल्यांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक लोकांना एकापेक्षा अधिक व्याधी जडलेल्या होत्या.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.७५ टक्के इतका कमी राखण्यात सरकारला यश आले आहे. हा जगातील सर्वात कमी मृत्यूदर आहे. देशात दररोज होणाºया कोरोना चाचण्यांच्या संख्येत झालेली वाढ, रुग्णांना त्वरित मिळणारे वैद्यकीय उपचार यामुळे या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.एका दिवसात ११ लाख ७२ हजार कोरोना चाचण्याइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार २ सप्टेंबर रोजी देशामध्ये ११,७२,१७९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. कोरोना चाचण्यांचा एका दिवसातील संख्येचा हा उच्चांक आहे. कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता ४,५५,०९,३८० झाली आहे. दररोज दहा लाख कोरोना चाचण्या करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने राखले होते. ते याआधीही दोन-तीनदा गाठले होते; पण आता निर्धारित लक्ष्यापेक्षा आणखी एक लाख चाचण्या अधिक करून सरस कामगिरी करण्यात आली आहे.8,15,538 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असून, ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या २१.१६ टक्के इतकी आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा आकडा ७ आॅगस्ट रोजी, तर ३० लाखांचा आकडा २३ आॅगस्ट रोजी ओलांडला होता.कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ७,५१६, कर्नाटकमध्ये ५,९५०, दिल्लीत ४,४८१, आंध्र प्रदेशमध्ये ४,१२५, उत्तर प्रदेशमध्ये ३,६१६, पश्चिम बंगालमध्ये ३,३३९, गुजरातमध्ये ३,०४६, पंजाबमध्ये १,६१८ इतकी आहे.५ राज्यांत कोरोनाचे ६२% रुग्ण, महाराष्टÑ पहिल्या, तर आंध्र दुसºया स्थानीदेशात कोरोनाच्या चाचण्या वाढण्याबरोबरच संक्रमणही घटत आहे. कोरोनाच्या काळात जीवन महत्त्वपूर्ण आहे व जीवनासाठी उदरनिर्वाह महत्त्वाचा आहे. म्हणूनच राज्यांशी विचारविनिमय केल्यानंतर आर्थिक व्यवहार सुरू केले जात आहेत. २४ तासांत ११.७२ लाख विक्रमी चाचण्या करण्यात आल्या. यातील पॉझिटिव्हिटी दर ७.२० टक्के आहे. एका दिवसात सर्वाधिक ६८,५८४ कोरोना रुग्ण संक्रमित झाले. याबरोबरच कोरोनातून बरे होणारांची संख्या २९,७०,४९२ झाली आहे. बरे होणारांचे प्रमाण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा ३.६ पट जास्त आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सचिव राजेश भूषण यांनी दिली.दररोज ९.५ लाख चाचण्या केल्या जात आहेत. शास्त्रज्ञ रात्रंदिवस लस तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत व चाचण्या घेत आहेत. मंत्रालयाकडून वित्त, व्यवस्थापन, कोल्ड चेन, परिवहन व लसीच्या संरक्षणाची व्यवस्था होत आहे. पाच राज्यांत कोरोनाचे ६२ टक्के रुग्ण आहेत. उर्वरित ३७.६६ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण अन्य राज्यांत आहेत.महाराष्टÑात सर्वाधिक २४.७७ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेश १२.६४ टक्के, कर्नाटक ११.५८, उत्तर प्रदेश ६.९२ व दिल्लीत ६.४२ टक्के रुग्ण आहेत. पाच राज्यांत मागील तीन आठवड्यांत कोरोना रुग्णांची संख्या महाराष्टÑात ६.८ टक्के, तामिळनाडूत २३.९ टक्के, कर्नाटकात १६.१ टक्के, आंध्रात १३.७ टक्के व उत्तर प्रदेशात १७.१ टक्के कमी झाली आहे. देशातील ७० टक्के मृत्यू याच राज्यात झालेले आहेत. महाराष्टÑात ११.५ टक्के, आंध्रात ४.५ व तामिळनाडूत १८.२ टक्के मृत्यूदरात घट झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य