शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

‘वीरपत्नी’ आजींना सॅल्यूट; १० किमी चालत जाऊन PM Cares फंडासाठी दिले २ लाख रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 21:20 IST

शुक्रवारी त्या घरातून निघाल्या आणि अगस्त्यमुनी शहरापर्यंत पायीच गेल्या. तिथल्या स्टेट  बँकेच्या शाखेतून त्यांनी PM Cares Fund च्या नावाने २ लाख रुपयांचा ड्राफ्ट बनवून घेतला.

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी प्रत्येक देशवासीयानं योगदान देणं गरजेचं आहे. घरातच थांबणं, घरच्यांची काळजी घेणं, गरीब-मजुरांना सांभाळून घेणं अशा छोट्या-छोट्या गोष्टींपासून ते भरीव आर्थिक मदत करणं, कोरोना वॉरियर म्हणून प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्यापर्यंत अनेक माध्यमांतून आपण या लढ्यात सहभागी होऊ शकतो. तसा, असंख्य जणांनी आपापल्या परीनं खारीचा वाटा उचलून या संकटातून देशाला सावरण्याचा  प्रयत्न केला आहे – अजूनही करत आहेत. या योद्ध्यांचं – दानशूरांचं मनोधैर्य वाढवणारं, त्यांना नवी उमेद देणारं एक आदर्श पाऊल ८० वर्षांच्या आजींनी उचललंय.

वीरपत्नी दर्शनी देवी या उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील डोभा-डडोली गावात राहतात. शुक्रवारी त्या घरातून निघाल्या आणि अगस्त्यमुनी शहरापर्यंत पायीच गेल्या. तिथल्या स्टेट  बँकेच्या शाखेतून त्यांनी PM Cares Fund च्या नावाने २ लाख रुपयांचा ड्राफ्ट बनवून घेतला. त्यानंतर, त्या गावात परत आल्या आणि नगरपरिषदेचे कार्यकारी अधिकारी हरेंद्र चौहान यांच्याकडे त्यांनी डीडी सुपूर्द केला. त्यांचं हे दातृत्व पाहून अधिकारी भारावले आणि त्यांनी आजींचा हार घालून सत्कार केला. आपल्याला मिळणाऱ्या पेन्शनमधून बचत म्हणून बाजूला ठेवलेली ही रक्कम आजींनी देशहितासाठी  दिली. त्यासाठी त्यांना १० किलोमीटर अंतर चालावं लागलं, पण थकव्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर समाधानच अधिक होतं.  

दर्शनी देवी यांचे पती कबूतर सिह रौथाण हे १९६५च्या भारत-पाकिस्तान  युद्धात शहीद झाले होते. अपत्य नसल्यानं त्या एकट्याच राहत आहेत आणि देशप्रेमाचा वसा समर्थपणे चालवत आहेत. कोरोना विषाणूनं  पूर्ण जगात थैमान घातलंय आणि देशातील जनताही या संकटाशी सामना करत असल्याची चर्चा गावात होत असते. अशावेळी बरेच जण सढळ हस्ते केंद्र आणि राज्य सरकारांना मदत करत असल्याचं समजलं आणि मी माझ्या परीने योगदान देण्याचा निर्णय घेतला, असं आजींनी सांगितलं. त्यांनी दाखवलेली जिद्द आणि दान देण्याची वृत्ती आजच्या काळात खरोखरच प्रेरणादायी आहे.

(फोटो सौजन्यः सोशल मीडिया)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याIndian Armyभारतीय जवान