शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: पीएम केअर फंडात २.५१ लाख दिले; पण आईला बेड मिळवू शकलो नाही, अहमदाबादच्या विजय पारेख यांनी सांगितली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 06:05 IST

PM Care Fund: पीएम केअर फंडात २.५१ लाख रुपये जमा केलेल्या विजय पारेख यांना त्यांच्या मरणाच्या दारात असलेल्या कोरोनाबाधित आईसाठी धावपळ करूनही बेड मिळाला नाही. त्यांनी ही व्यथा ट्विटरवर सांगितली आहे. 

मुंबई : पीएम केअर फंडात २.५१ लाख रुपये जमा केलेल्या विजय पारेख यांना त्यांच्या मरणाच्या दारात असलेल्या कोरोनाबाधित आईसाठी धावपळ करूनही बेड मिळाला नाही. त्यांनी ही व्यथा ट्विटरवर सांगितली आहे. कोरोनाची पहिली लाट आली आणि देशात पहिल्यांदाचा लॉकडाऊन लागू झाले. त्यामुळे गरीब आणि कामगार वर्गाचे फार हाल झाले. या संकटात मदतीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या आवाहनाला देशातून मोठा प्रतिसाद मिळाला. अब्जावधी रुपये पीएम केअर्स फंडात जमा झाले. अहमदाबादच्या विजय पारेख यांनी या फंडात २.५१ लाख रुपये जमा केले होते. पारेख यांची आई कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झाली. तिच्यावर उपचार व्हावेत यासाठी इकडेतिकडे धावपळ करूनही पारेख यांना बेड मिळाला नाही. त्यामुळे, पारेख यांनी आपली शोकांतिका ट्विटर अकाउंटवर सांगितली. त्यांनी १० जुलै २०२० रोजी २.५१ लाख रुपये जमा केल्याची पावतीही शेअर केली आहे.

भावनिक ट्वीट ‘मी पीएम केअर फंडात २.५१ लाख रुपये जमा केले, पण मरणाच्या दारात असलेल्या माझ्या आईला बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे, मला मार्गदर्शन करा की, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मी कुठे मदत करू, ज्यामुळे मला बेड मिळेल आणि मी कुणाला गमावणार नाही,’ असे भावनिक ट्वीट पारेख यांनी केले आहे.  पारेख यांचे हे ट्वीट खूप व्हायरल होत आहे. फक्त १२ तासांत १४ हजार लाइक्स आणि ६,२०० रिट्वीट झाले आहे. विशेष म्हणजे पारेख यांचे यापूर्वीचे ट्वीट पाहिल्यास ते भाजप समर्थक असल्याचे दिसते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGujaratगुजरात