शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या शक्यतेने केंद्रीय कार्यालयात बायोमेट्रिक पद्धत बंद; देशात ३४ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 01:38 IST

काश्मीरमधील शाळा बंद; फेसबुकच्या तीन देशांतील कार्यालयांना सुट्टी

नवी दिल्ली : कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग झालेल्या भारतीयांची संख्या शनिवारी ३४ वर पोहोचली असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या साथीच्या प्रतिबंधासाठी योजण्यात येणाºया उपायांचा आढावा घेतला. जगभरात कोरोनाच्या बळींची संख्या ३,५00 वर गेली असून, एक लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. चीनमधील मृतांची संख्या मात्र कमी होत चालली आहे.

कर्मचाऱ्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी देऊ नये, असे पत्रक केंद्र सरकारने काढले आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटकमध्येही सरकारी कर्मचाºयांना बायोमेट्रिक हजेरी द्यावी लागणार नाही. काश्मीर खोºयात चार जिल्ह्यांतील प्राथमिक शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनाचा रुग्ण कार्यालयात आढळल्याने फेसबुकने आपले लंडन, सॅन फ्रान्सिस्को व सिंगापूर येथील कार्यालये बंद केली आहेत. कोरोनाची लागण झालेल्यांना वेगळे ठेवण्यासाठी पुरेशी क्वारंटाइन केंद्रे उभारण्याची तयारी ठेवा व साथीचा प्रसार वाढतो आहे असे दिसल्यास उपचार व औषधांचा तुटवडा भासू देऊ नका, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले.तीन नवे रुग्ण आढळल्याने भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३४ झाली. नव्या रुग्णांमधील एक दिल्लीचा रहिवासी आहे. इतर दोघांपैकी एक लडाखमधील असून, तो इराणला जाऊन आला होता. तिसरा तामिळनाडूतील असून, तो काही दिवसांपूर्वी ओमानला गेला होता. पंजाब व श्रीनगरमध्ये प्रत्येकी दोन संशयित रुग्ण आढळले असून, त्यांची तपासणी सुरू आहे. इराणमधील ३०० भारतीयांचे नमुने विमानाने येथे पोहोचले असून, ते चाचणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना