शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

Corona Virus : ना टेस्टिंगची सुविधा, ना व्हॅक्सीन..., 14 लाख लोक तापानं फणफणले; उत्तर कोरियात कोरोनाचा हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 15:04 IST

नॉर्थ अँटी व्हायरस मुख्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या एक निवेदनानुसार, उत्तर कोरियात आतापर्यंत तापामुळे 56 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसने आता उत्तर कोरियात थैमान घालायला सुरुवात केली आहे. येथे कोरोनाची पुष्टी झाल्यापासून तापाने फणफणनाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. येथे मंगळवारी 269,510 लोकांमध्ये तापाची लक्षणं दिसून आली आहेत. याशिवाय आणखी 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, उत्तर कोरियात फार कमी प्रमाणावर लसीकरण झाले आहे. यामुळे येथे कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याचे मानले जात आहे.

नॉर्थ अँटी व्हायरस मुख्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या एक निवेदनानुसार, उत्तर कोरियात आतापर्यंत तापामुळे 56 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल 14.8 लाख लोक आजारी पडले आहेत. तर, तज्ज्ञांच्या मते, उत्तर कोरियातील बहुतांश लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. एवढेच नाही, तर गरिबी आणि कमकुवत आरोग्य व्यवस्था अशा अनेक कारणांमुळेही उत्तर कोरियात कोरोना टेस्टची, लसींची आणि उपचारांचीही पुरेशी व्यवस्था नाही.

कोरियात 6.6 लाख लोक क्वारंटाईन -उत्तर कोरियात सध्या 663,910 लोक क्वारंटाईन आहेत. मात्र ताप आलेल्या किती रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, हे अद्याप उत्तर कोरियाने स्पष्ट केलेले नाही. एवढेच नाही, तर उत्तरकोरियामध्ये लोकांपर्यंत टेस्टिंग सुविधा पोहोचणेही कठीण झाले आहे. यामुळे संक्रमणाची माहिती मिळणेही कठीण झाले आहे. केवळ शेल्टरमध्ये राहणाऱ्या लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांनाच उपचार मिळू शकत  आहे, असे बोलले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरिया