शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे हळदीची निर्यात वाढणार; परदेशासह देशांतर्गतही मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:10 IST

वापर वाढला

- अविनाश कोळी सांगली : कोरोनाने अनेक क्षेत्रांना झटका दिला असताना, औषधी गुणधर्मामुळे हळदीला मागणी वाढत आहे. त्यामुळे दरवर्षी होणारी सात लाख पोती निर्यात यंदा दहा लाखांवर जाण्याची शक्यता हळद व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. देशांतर्गत मागणीतही सुमारे १५ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.

सांगली, हिंगोली, बसमत, नांदेड, जळगाव येथून दरवर्षी हळदीचे उत्पादन घेतले जाते. आंध्र प्रदेशमधील हळदीलाही मागणी आहे. सध्या सांगली मार्केट यार्डात या सर्व ठिकाणांहून माल येत आहे. कोरोनामुळे यंदा मार्केट यार्डातील उलाढाल केवळ ४० ते ५० टक्केच होत असली तरी, अद्याप शेतकऱ्यांकडे माल पडून आहे.

जानेवारी ते जूनअखेर हळदीचा हंगाम असला तरी, त्यानंतरही बारमाही हळदीची उलाढाल सांगलीत सुरू असते. कोरोनाकाळात औषधी गुणधर्मामुळे अनेक औषधांमध्ये, काढ्यामध्ये त्याचा वापर सुरू झाल्याने मागणीत वाढ दिसत आहे.

परदेशातूनही मागणी होत आहे. ज्या देशांकडून हळदीची मागणी होत नव्हती, त्यांच्याकडूनही मागणी केली जात आहे. त्यामुळे दरवर्षी भारतातून होणारी ७ लाख पोती (५० किलोची) हळदीची निर्यात यंदा १० लाखांवर जाण्याची शक्यता हळद व्यापाºयांनी व्यक्त केली आहे. देशांतर्गत मागणीतही १५ टक्के वाढ होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी ९० ते ९५ लाख पोती हळदीचे देशांतर्गत उत्पादन होते.

देशांतर्गत व देशाबाहेर हळदीला मागणी वाढणार आहे. कोरोनामुळे औषधी असणाºया हळदीचा वापर वाढला आहे. त्याचा परिणाम निर्यात व देशांतर्गत उलाढालीवर होणार आहे. निर्यातीत मोठी वाढ होणार असल्याने चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.- मनोहरलाल सारडा, चेंबर आॅफ कॉमर्स, सांगली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत