शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

Corona Virus : दुसऱ्या लाटेसारखी कोविडची तिसरी लाट नसणार विनाशकारी, केंद्र सरकारच्या आरोग्य तज्ज्ञांचे मत; सणासुदीत नियम पाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 5:25 AM

Corona Virus : दुसरी लाट शिखरावर असताना ७ मे रोजी २४ तासातील कोविड रुग्णसंख्या तब्बल  ४.१४ लाख होती. ती आता २० हजाराच्याही खाली आली आहे. त्यातच कोविड लस मात्रांनी १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

नवी दिल्ली : मागील काही महिन्यापासून भारतात सुरू असलेल्या जोरदार लसीकरणामुळे कोरोनावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात आले असून, तिसरी लाट आलीच तर ती दुसऱ्या लाटेसारखी विनाशकारी असणार नाही, असे मत भारत सरकारच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र खबरदारी म्हणून सणासुदीच्या काळात नागरिकांनी सुरक्षात्मक उपायांचे काटेकोर पालन करायला हवे, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

दुसरी लाट शिखरावर असताना ७ मे रोजी २४ तासातील कोविड रुग्णसंख्या तब्बल  ४.१४ लाख होती. ती आता २० हजाराच्याही खाली आली आहे. त्यातच कोविड लस मात्रांनी १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे आगामी काळात तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटेएवढी विनाशकारी असणार नाही, असे तज्ज्ञांना वाटते. केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीच्या आधारे जागतिक आरोग्य संघटनेने (हू) भारतातील सुधारलेल्या स्थितीबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

हूच्या अहवालानुसार, काही अपवाद वगळता बहुतांश मोठ्या राज्यातील स्थिती नियंत्रणात आहे. केरळातील स्थिती अजूनही चिंताजनक आहे. १३ ते १९ ऑक्टोबर या आठवड्यात केरळातील ३० जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ५६ टक्के रुग्ण महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यातीलआहेत. 

१६,३२६ जणांना कोरोनाचा संसर्ग; ६६६ जणांचा मृत्यूशनिवारी हाती आलेल्या अहवालानुसार, देशात १६,३२६ जणांना कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झाला असून आता एकूण बाधितांची संख्या ३,४१,५९,५६२ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १,७३,७२८ असून हा २३३ दिवसांतील नीचांक ठरला.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी ६६६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आता ४,५३,७०८ झाला आहे. सलग २९ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ३० हजारांच्या आत, तर ११८ दिवसांपासून ५० हजारांच्या आत राहिली आहे. शुक्रवारी १३,६४,६८१ कोविड टेस्ट करण्यात आल्या. त्याबरोबर एकूण टेस्टची संख्या ५९,८४,३१,१६२ झाली आहे. आजारातून बरे झालेल्यांची संख्या आता ३,३५,३२,१२६ झाली आहे.  मृत्यूदर १.३३ टक्के झाला आहे. दरम्यान, देण्यात आलेल्या कोरोना लस मात्रांची संख्या १०१.३० कोटी झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस