शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : निष्काळजीपणाचा कळस! 3 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेला दिली कोरोना लस, मेसेजने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 20:18 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर तीन महिन्यांनी लसीचा डोस घेतल्याचा मेसेज आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,419 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 159  जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,74,111 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान वेगाने लसीकरण सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर तीन महिन्यांनी लसीचा डोस घेतल्याचा मेसेज आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. 

बिहारमध्ये एका मृत महिलेला कोरोना लस दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्ती कोरोना लसीचा डोस कसा घेऊ शकते हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. कौशल्या देवी असं महिलेचं नाव असून तिने 26 एप्रिल 2021 रोजी छपरा येथील रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. मात्र त्यानंतर काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला. मृत्यूच्या तीन महिन्यांनंतर आता 9 डिसेंबर 2021 रोजी रजिस्टर्ड मोबाईल नंबर कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज आला आहे. यामुळे कुटुंबीयांना आता मोठा धक्का बसला आहे. महिलेच्या मुलाने हा प्रकार सांगितला आहे. 

"कोरोना लसीचं प्रमाणपत्र देखील झालं डाऊनलोड"

"आईच्या मृत्यूला तीन महिने झाल्यानंतर आता कोरोना डोस घेतल्याचा मेसेज आल्याने घरातील सर्व मंडळींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिने लसीचा पहिला डोस घेतला होता. पण त्यानंतर काही दिवसांनी तिची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला. त्याला आता तीन महिने पूर्ण झाल्यावर डोस घेतल्याचा मेसेज आला आहे. मेसेजमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कोरोना लसीचं प्रमाणपत्र देखील डाऊनलोड झालं आहे" अशी माहिती महिलेच्या मुलाने दिली आहे. याआधी देखील अशा अनेक घटना या समोर आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस