शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

जानेवारीत 87 हजार रुग्ण कमी झाले, पण फेब्रुवारीत कोरोनाबाधित 1.65 लाखांवर

By महेश गलांडे | Updated: March 1, 2021 11:42 IST

रविवारी देशात 15,614 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, 11,291 लोक बरे झाले असून 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देमध्य प्रदेशमध्ये रविवारी 363 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 243 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजमित्तीस 2,785 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

नवी दिल्ली - देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे, महाराष्ट्रासह अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गेल्या 5 दिवसांत सलग 15 हजारांपेक्षा अधिक रुग्ण पॉझिटीव्ह आढळून येत आहेत. तसेच, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. देशभरात 31 डिसेंबर रोजी 2 लाख 52 हजार 701 रुग्ण एक्टीव्ह होते, पण 31 जानेवारी रोजी ही रुग्णसंख्या घटून 1 लाख 65 हजार 715 पर्यंत पोहोचली होती. रुग्णसंख्या कमी होण्याची हीच सरासरी फेब्रुवारी महिन्यात राहिली असती तर हा आकडा 80 हजारांपर्यंत आला असता. 

रविवारी देशात 15,614 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, 11,291 लोक बरे झाले असून 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 1.07 कोटीपेक्षा जास्त लोक कोरोनामुक्त झाले असून 1 लाख 57 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत देशभरात 1.65 लाक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

देशातील 6 राज्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढला आहे. 

महाराष्ट्रात रविवारी 8,293 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, 3753 रुग्ण बरे झाले असून 62 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आत्तापर्यंत 21 लाख 55 हजार 70 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी, 20 लाख 24 हजार 704 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 52 हजार 154 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. सद्यस्थितीत 77 हजार 8 रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

महाराष्ट्रानंतर केरळमध्येही रुग्णांची संख्या वाढली असून रविवारी 3254 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, 4333 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, 15 जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये आत्तापर्यंत 10 लाख 59 हजार 404 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यामध्ये 10 लाख 5 हजार 497 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत 49 हजार 416 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

मध्य प्रदेशमध्ये रविवारी 363 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 243 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजमित्तीस 2,785 रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यानंतर, दिल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून रविवारी 197 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच, 168 रुग्ण बरे झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत दिल्लीत 1335 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीनंतर गुजरातमध्येही कोरोना रुग्णसंख्या वाढत असून रविवारी 407 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आहे. गुजरातमध्ये सद्यस्थितीत 2363 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, राजस्थानमध्ये रविवारी 156 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले, येथील राज्यात सद्यस्थितीत 1308 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरात