शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

CoronaVirus News : कोरोनाच्या भीतीपोटी महिलांचा रुग्णालयात जाण्यास नकार; 'या' ठिकाणी 61 माता, 877 बालकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 10:44 IST

CoronaVirus News : कोरोना काळात संसर्गाच्या भीतीपोटी अनेक गर्भवती महिलांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला आणि त्यांना यामध्ये जीव गमवावा लागला आहे.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 4 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,549 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 31 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल पाच लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी या काळात कोरोनाचा धसका घेतला. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. मेघालयमध्ये कोरोनाकाळात 61 माता, 877 बालकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना काळात संसर्गाच्या भीतीपोटी अनेक गर्भवती महिलांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला आणि त्यांना यामध्ये जीव गमवावा लागला आहे. मेघालयमध्ये कोरोना कालावधीत गर्भवतींनी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिल्याने 61 माता आणि 877 नवजात बाळांचा मृत्यू झाला, अशी माहिती मेघालय सरकारने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला दिली आहे. कोरोनाकाळात मेघालयात गर्भवती माता आणि बाळांचे मृत्यू वाढल्याची दखल घेत आयोगाने राज्य सरकारकडे माहिती मागितली होती. मेघालयातील अशा मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याची नोंद राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतल्यानंतर मेघालय सरकारने याबाबत कृती अहवाल आयोगाला सादर केला आहे. 

वैद्यकीय मदत न मिळाल्याने यातील बहुसंख्य मृत्यू झाले आहेत. कोरोना चाचणी करण्यास नकार दिला जात होता, तसेच गर्भवती महिला कोरोना संसर्गाच्या भीतीने रुग्णालयात दाखल होत नव्हत्या, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना व्हायरसचं नवीन म्यूटेशन विध्वंस आणू शकतो. हा नवीन प्रकार डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून बनलेला आहे. डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की हे नवीन कॉम्बिनेशन व्हायरसबद्दल आधीच भीती होती कारण ते दोन्ही खूप वेगाने पसरत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या नव्या संशोधनातून हे समोर आलं आहे.

डेल्टा अन् ओमायक्रॉन एकत्र येऊन घडवू शकतात विनाश; WHO ने दिला धोक्याचा इशारा

WHO मध्ये कोरोना टेक्निकल टीमचे नेतृत्व करणाऱ्या मारिया वॅन कर्खोव यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की हे अपेक्षित होतं, विशेषत: हे दोन्ही प्रकार खूप वेगाने पसरत आहेत. WHO या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे आणि या संदर्भात अभ्यास सुरू आहे. जेव्हा सुरुवातीला लोकांना डेल्टा आणि ओमायक्रॉन प्रकारांच्या एकत्रित प्रकाराची भीती वाटली आणि त्याला डेल्टाक्रोन म्हटलं गेलं, तेव्हा WHO ने सांगितले की डेल्टा आणि ओमाक्रॉन कॉम्बिनेशन असं काहीही नाही. मारिया यांनी स्पष्ट केलं की एक व्यक्तीला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारांचा संसर्ग होऊ शकतो. कोरोनामुळे काही ठिकाणी अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलpregnant womanगर्भवती महिला