शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : सलग चौथ्या दिवशी एक लाखांहून कमी रुग्ण; ३४०३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 05:58 IST

Corona Virus : देशात २ कोटी ९२ लाख ७४ हजार ८२३ कोरोना रुग्णांपैकी २ कोटी ७७ लाख ९० हजार ७३ जण बरे झाले आणि एकूण ३ लाख ६३ हजार ७९ जण मरण पावले.

नवी दिल्ली : सलग चौथ्या दिवशी देशात कोरोनाचे एक लाखांहून कमी रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांची संख्या ९१,७०२ असून, ३४०३ जण मरण पावले. सक्रिय रुग्णांचे प्रमाणही  कमी होत आहे.

देशात २ कोटी ९२ लाख ७४ हजार ८२३ कोरोना रुग्णांपैकी २ कोटी ७७ लाख ९० हजार ७३ जण बरे झाले आणि एकूण ३ लाख ६३ हजार ७९ जण मरण पावले. बिहारने कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या आकड्यात बुधवारी ३९७१ ने दुरुस्ती केल्याने गुरुवारी ६१३८ मरण पावल्याचे दिसून आले होते.   मात्र, गुरुवारी दिवसभरात  साडेतीन हजारांपेक्षा कमी मृत्यू झाले. ६१ दिवसांनंतर रुग्ण ११ लाख २१ हजार ६७१ वर आले आहेत. 

गेल्या चोवीस तासांत १ लाख ३४ हजार ५८० जण बरे झाले. हे प्रमाण ९४.९३ टक्के आहे. सलग २९ व्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे जास्त आहेत. कोरोना संसर्गाचे दर आठवड्याचे, दररोजचे प्रमाण अनुक्रमे ५.१४ टक्के व ४.४९ टक्के आहे. संसर्गाची पातळी सलग १८ व्या दिवशी १० टक्क्यांच्या खाली राखण्यात यश मिळाले आहे.इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सांगितले की, आतापर्यंत ३७ कोटी ४२ लाख ४२ हजार ३८४ कोरोना चाचण्या झाल्या  असून, २४ कोटी ६० लाख ८५ हजार ६४९ डोस लोकांना देण्यात आले आहेत.

जगात १ कोटी २३ लाख सक्रिय रुग्ण- जगभरात एकूण १७ कोटी ५६ लाख रुग्णांपैकी १५ कोटी ९१ लाख जण बरे झाले आहेत.- ३७ लाख ८८ हजार जणांचा बळी गेला आहे. जगात १ कोटी २३ लाख लोकांवर उपचार सुरू आहेत.

अमेरिकेत सव्वासहा लाख बळी- अमेरिकेमध्ये कोरोनाचे ३ कोटी ४२ लाख रुग्ण आहेत. त्यातील २ कोटी ८२ लाख लोक बरे झाले असून,  सव्वासहा लाख लोक मरण पावले आहेत. त्या देशात ५३ लाख ८३ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - ब्राझीलमध्ये १ कोटी ७२ लाख कोरोना रुग्ण असून, आतापर्यंत ४ लाख ८२ हजार लोक मरण पावले आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या